• Download App
    मध्य प्रदेशात महापौरपद निवडणुकीत भाजपला 9, तर काँग्रेसला 5 जागा; पहिल्यांदाच काँग्रेसला मिळाले एवढे यश|BJP wins 9 seats, Congress wins 5 seats in Madhya Pradesh mayoral elections, after 28 years, Congress tunnels into BJP's stronghold

    मध्य प्रदेशात महापौरपद निवडणुकीत भाजपला 9, तर काँग्रेसला 5 जागा; पहिल्यांदाच काँग्रेसला मिळाले एवढे यश

    प्रतिनिधी

    भोपाळ : 2015-16 मध्ये झालेल्या महापौरांच्या निवडणुकीत 16-0 ने क्लीन स्वीप करणाऱ्या भाजपला यंदा 9 जागाच जिंकता आल्या, तर काँग्रेसने पाच जागा जिंकून 23 वर्षांनंतर इतिहास घडवला. महापौरांची निवड थेट करण्याची सुरुवात 1994 पासून सुरू झाल्यानंतर पहिली निवडणूक 1999 मध्ये झाली. तेव्हाही काँग्रेसला कधीही दोन-तीन महापौरपदे मिळू शकली नव्हती. काँग्रेसने 2022 मध्ये प्रथमच महापौरपदाच्या पाच जागा खिशात टाकल्या. भाजपच्या अनेक दिग्गजांच्या बालेकिल्ल्यात काँग्रेसने हे यश मिळवले.BJP wins 9 seats, Congress wins 5 seats in Madhya Pradesh mayoral elections, after 28 years, Congress tunnels into BJP’s stronghold



    बुधवारी दुसऱ्या टप्प्यात 214 नगरपालिकांसह पाच महापालिकांच्या महापौरपद निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. रतलाम आणि देवासमध्ये भाजपच्या महापौर उमेदवाराने विजय नोंदवला, तर रिवा आणि मुरैनात काँग्रेस उमेदवार विजयी झाले. कटनीत भाजपतून बंडखोरी करत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या प्रीती सुरी यांनी महापौरपदाची निवडणूक जिंकली. केंद्रीय मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या मुरैना लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवार शारदा सोळंकी यांनी भाजपच्या मीनादेवी यांना पराभूत केले. पहिल्या टप्प्यात ग्वाल्हेरमध्येही काँग्रेसने विजय मिळवला आहे. नगरपालिका, नगर परिषदेत भाजपला दोन तृतीयांशपेक्षा जास्त ठिकाणी बहुमत मिळाले.

    BJP wins 9 seats, Congress wins 5 seats in Madhya Pradesh mayoral elections, after 28 years, Congress tunnels into BJP’s stronghold

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!