विशेष प्रतिनिधी
पणजी: गोवा विधानसभा निवडणुकीत भाजप जबरदस्त कामगिरी करणार असल्याचा अंदाज एबीपी- सी व्होटरच्या सर्व्हेत स्पष्ट झाले आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष असलेल्या कॉँग्रेसला जबरदस्त दणका बसणार असून आम आदमी पक्षापेक्षाही (आप) कॉँग्रेसला कमी जागा मिळणार आहे.BJP will do tremendously in Goa, Congress will go even lower than Aap
गेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष ठरूनही काँग्रेसला गोव्यात सरकार स्थापन करता आलं नव्हतं. भारतीय जनता पक्षानं छोट्या पक्षांची मदत घेत सत्ता मिळवली. त्यावेळी मनोहर पर्रिकर यांना मुख्यमंत्रीपद देण्यात आले. पर्रिकरांच्या निधनानंतर होत असलेल्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीत भाजप जबरदस्त कामगिरी करण्याची शक्यता आहे.
एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे.गेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला गोव्यात केवळ १३ जागा मिळाल्या आहेत. एकूण ४० जागा असलेल्या विधानसभेत बहुमतापासून भाजप बराच दूर होता. या निवडणुकीत काँग्रेसनं सर्वाधिक १७ जागा जिंकल्या होत्या.
मात्र लहान पक्षांच्या मदतीनं भाजपनं सरकार स्थापन केलं. एबीपी-सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, राज्यातील भाजपचं सरकार कायम राहण्याची शक्यता आहे.पुढील वर्षी होत असलेल्या निवडणुकीत भाजप तब्बल २७ जागा जिंकेल, असं सर्वेक्षणात म्हटले आहे.
भाजपच्या जागा दुप्पट होत असताना काँग्रेसला मोठा फटका बसणार आहे. काँग्रेसच्या जागा १७ वरून थेट ४ वर येण्याची शक्यता आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष या निवडणुकीत ५ जागा जिंकेल असा अंदाज आहे. इतरांना ६ जागा मिळू शकतात.
गेल्या निवडणुकीत भाजपला ३२.५ टक्के मतं मिळाली होती. ती आता ३७.५ टक्क्यांवर जाताना दिसत आहेत. काँग्रेसच्या मतांमध्ये घसरण होईल असा अंदाज आहे. २०१७ मध्ये काँग्रेसला २८.४ टक्के मतं मिळाली होती. ती आता १८.३ टक्क्यांवर येतील. मागील निवडणुकीत ६.३ टक्के मतं मिळवलेल्या आपच्या मतांमध्ये घसघशीत वाढ होऊ शकते. त्यांना यंदा २२.८ टक्के मतं मिळतील असा अंदाज आहे.
BJP will do tremendously in Goa, Congress will go even lower than Aap
महत्त्वाच्या बातम्या
- सोमवारपासून पुणे जिल्ह्यातील महाविद्यालये, विद्यापीठ आणि पर्यटनस्थळे सुरू होणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
- ब्रिटनमध्ये भारतीय प्रवाशांची क्वारंटाइनची कटकट मिटली, भारत आणि ब्रिटनदरम्यान प्रवास सुलभ करण्यासाठी सहमती, दोन्ही देशांच्या नियमांत बदल
- Cruise Drugs Case : यामुळे फेटाळला आर्यन खानचा जामीन; जेथे कसाब, सलेम आणि संजय दत्तने भोगली शिक्षा त्याच कारागृहात आर्यनची रवानगी
- मोठी बातमी : केंद्राचे मुख्य आर्थिक सल्लागार के. व्ही. सुब्रमण्यम यांचा राजीनामा, म्हणाले- राष्ट्राची सेवा करणे परमसौभाग्य, पुन्हा शिक्षण जगतात परतणार