‘’…त्यामुळे मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा.’’ असं बावनकुळेंनी म्हटलं आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधित करताना, २०२४मध्ये मी पुन्हा येणार असल्याचं ठामपणे सांगितलं. त्यांच्या या भाषणावर शरद पवार यांनी टीका केली. तर पवारांच्या टीकेला महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. BJP State President Bawankule responded to Sharad Pawars criticism of Modi
बावनकुळे म्हणाले, ‘’ज्या शरद पवार यांना आपल्या पक्षाचा राष्ट्रीय दर्जा टिकवता आला नाही ते पवार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करीत आहेत. पवार तुम्ही राजकारण करताना कायम साडेतीन जिल्ह्यांचाच विचार केला आणि आज भाजपा देशभरात कुठल्या राज्यात आहे आणि कुठल्या राज्यात नाही हे गणित सांगत सुटला आहात.‘’
याशिवाय ‘’मोदी पुन्हा येणार नाहीत असं भाकीत तुम्ही केलं, पण तुमचं हे भाकीत खरं होणार नाही. कारण जनता मोदीजींच्या पाठीशी कालही होती आणि आजही आहे. ‘’असं बावनकुळे यांनी म्हटले आहे.
याशिवाय, ‘’समाजात द्वेष निर्माण करण्याचं काम कुणी केलं हे महाराष्ट्रातील जनतेनं तुमचं सरकार असताना पाहिलंय. त्यामुळे मोदींकडे बोट दाखवण्यापूर्वी एकदा आपली कारकीर्द तपासून बघा. बाकी परिवार बचाव पार्टीला सोबत घेऊन तुम्ही कितीही ‘घमंडीया‘ ची मोट बांधण्याचा प्रयत्न केला, तरीही देशातील जनता २०२४ मध्ये सुद्धा मोदी आणि भाजपाला साथ देईल, याबाबत आपण निश्चिंत राहावे. ‘’ अशा शब्दांमध्ये बावनकुळे यांनी शरद पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
शरद पवार काय म्हणाले आहेत? –
‘’आज सत्तेचा धडाधड गैरवापर सुरू आहे. केंद्र सरकारमध्ये बसलेले घटक अधिकारांचा गैरवापर करून राजकीय पक्षांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा आपल्याला यश मिळणार नाही ही खात्री पटते, तेव्हा या रस्त्याला माणूस जातो. त्यांनी कितीही जोरजोरात सांगितलं की, मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन तरी मोदींची अवस्था देवेंद्र फडणवीसांसारखी होईल. याबाबत माझ्या मनात शंका नाही.’’ अशा शब्दांमध्ये शरद पवारांनी मोदींवर टीका केली आहे.
BJP State President Bawankule responded to Sharad Pawars criticism of Modi
महत्वाच्या बातम्या
- ‘मॅकडोनाल्ड’ आणि ‘सबवे’ नंतर आता ‘बर्गर किंग’ देखील मेनूकार्ड मधून टोमॅटो गेले गायब!
- ”कधी कधी वाटतं चांद्रयान करून काय फायदा? चंद्रावर जाऊन खड्डेच पहायचेत तर महाराष्ट्रात पाठवायचं ना..” राज ठाकरेंचा संताप!
- राष्ट्रवादी कुणाची? निवडणूक आयोगाची शरद पवार आणि अजित पवार गटाला नोटीस, उत्तरासाठी तीन आठवड्यांची मुदत
- मीडिया पर्सेप्शन पलीकडले भाजपचे ग्राउंड वर्क सुरू; महाराष्ट्राचे 40 आमदार ट्रेनिंगसाठी जाणार मध्य प्रदेशात!!