• Download App
    पंजाबात भाजपच्या राजकीय हालचाली वाढल्या, अनेक नेत्यांशी चर्चा सुरु । BJP starts discussions in Punjab

    पंजाबात भाजपच्या राजकीय हालचाली वाढल्या, अनेक नेत्यांशी चर्चा सुरु

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : भाजपने आता पंजाबमध्ये आघाडीसाठी हालचाली सुरू केल्या असून त्यासाठी माजी मुख्यमंत्री कॅ. अमरिंदरसिंग आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखदेवसिंग धिंडसा यांच्या गटासोबत चर्चा सुरू असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले. शेतकरी आंदोलनाचा उत्तर प्रदेश आणि पंजाबमधील विधानसभा निवडणुकीवर फारसा परिणाम होणार नाही. केंद्र सरकारने आता कृषी कायदे रद्द केले असल्याने तो आता मुद्दाच शिल्लक राहिला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ते येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलत होते. BJP starts discussions in Punjab



    उत्तर प्रदेशात भाजप बहुमताने सरकार स्थापन करेल असा विश्वास व्यक्त करतानाच शहा यांनी पंजाबमध्ये आम्ही कॅप्टन साहेब आणि धिंडसा यांच्या संपर्कात आहोत असे नमूद केले. या दोन्ही पक्षांसोबत आघाडी करण्याबाबत आम्ही सकारात्मक असल्याचेही त्यांनी नमूद केले. शेतकऱ्यांचे आंदोलन संपविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी ह्रदय मोठे केले. मुळात कायदेच रद्द झाले असल्याने आता काही मुद्दे राहिले आहेत असे मला मुळीच वाटत नाही. आता निवडणूक केवळ विकासाच्या मुद्द्यावर लढली जाईल, असेही ते म्हणाले.

    BJP starts discussions in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!

    Karnataka : कर्नाटकच्या माजी डीजीपीच्या हत्येप्रकरणी पत्नीला अटक

    Rahul Gandhi : कर्नाटकनंतर राहुल गांधी यांचे हिमाचल-तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र