भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद यांनी राहुल गांधींना विचारला आहे प्रश्न
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली: केंद्र सरकारने युनिफाइड पेन्शन योजना (यूपीएस) लागू केली आहे. यावरून काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला. सरकारला पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मजबूर व्हावे लागले असे त्यांनी सांगितले. यावर भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे ज्येष्ठ नेते रविशंकर प्रसाद ( Ravi Shankar Prasad ) यांनी विचारले की, काँग्रेस आपली निवडणूक आश्वासने, विशेषत: पेन्शनची आश्वासने कधी पूर्ण करणार?
कायदा खात्याचा कार्यभार सांभाळलेले माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद म्हणाले, “मला राहुल गांधींना विचारायचे आहे की, त्यांच्या सरकारने हिमाचल प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना आश्वासनाप्रमाणे लागू केली आहे का? काँग्रेस पक्ष आपल्या निवृत्ती वेतनाबाबतच्या आश्वासनाच्या उघड खोटेपणामुळे इतका चिंतित झाला आहे, की लोकसभा निवडणुकीतील आपल्या जाहीरनाम्याचा भाग बनवण्याचे धैर्य ते दाखवू शकले नाही तसेच ते म्हणाले, “काँग्रेस पक्ष केवळ मते मिळविण्यासाठी घोषणा करतो आणि आता जनतेचा त्यांच्या निर्णयावरील विश्वास उडाला आहे.”
एकात्मिक पेन्शन योजना 2004 पूर्वीच्या जुन्या पेन्शन योजनेची बहुतेक वैशिष्ट्ये राखून ठेवते. यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या शेवटच्या मूळ वेतनाच्या 50 टक्के रक्कम आजीवन मासिक लाभ म्हणून देण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.
BJP responded to Congress criticism
महत्वाच्या बातम्या
- UPS : महायुती सरकारने UPS ला दिली मान्यता, केंद्राची नवीन योजना लागू करणारे महाराष्ट्र पहिले राज्य!
- विधानसभेसाठी पवारांचा ताटातलं वाटीतचा जुनाच फॉर्म्युला; भाजपचा “असाइनमेंट” आणि पंचायत गटांवर फोकसचा फॉर्म्युला!!
- Mehbooba Mufti : मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या- काँग्रेसने आमचा अजेंडा मान्य केल्यास युतीसाठी तयार; PDPचा जाहीरनामा प्रसिद्ध
- Jalna : जालन्यात लोखंडी सळई निर्मिती कारखान्यात भीषण स्फोट; 34 कामगार जखमी, 7 जण गंभीर