• Download App
    women’s reservation. ऑपरेशन टायगरच्या दुधखुळ्या बातम्यांच्या गदारोळात भाजपच्या खऱ्या ऑपरेशनकडे माध्यमांचे दुर्लक्ष!!

    ऑपरेशन टायगरच्या दुधखुळ्या बातम्यांच्या गदारोळात भाजपच्या खऱ्या ऑपरेशनकडे माध्यमांचे दुर्लक्ष!!

    नाशिक : ऑपरेशन टायगरच्या दुधखुळ्या बातम्यांच्या गदारोळात भाजप करत असलेल्या खऱ्या ऑपरेशन कडे माध्यमांचे दुर्लक्ष झाल्याची वस्तुस्थिती आज समोर आली.

    काल बारामतीचा विषय चघळून संपवल्यानंतर आज मराठी माध्यमांनी एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरच्या बातम्या चघळायला सुरुवात केली. एकनाथ शिंदे यांनी म्हणे, काल रात्री ताफ्यातून गाडी वळवून त्यांच्या घरी गावाकडे नेली. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नऊ पैकी आठ खासदारांची बैठक घेतली. आठ पैकी सहा खासदार बैठकीला प्रत्यक्ष हजर होते. दोन खासदार ऑनलाईन हजर होते एकनाथ शिंदेंनी म्हणे, या खासदारांना केंद्र सरकारमध्ये काम करायची संधी मिळण्याचे आश्वासन दिले. मराठी माध्यमांनी या सगळ्या बातम्या त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने दिल्या.

    – ऑपरेशन टायगरच्या बातम्या फेटाळल्या

    पण खुद्द श्रीकांत शिंदे यांनी त्या बातम्या फेटाळून लावल्या. एकनाथ शिंदे यांनी खासदारांची कुठलीही बैठक घेतली नाही. त्यामुळे ठाकरे गटाच्या कुठल्याच खासदाराने तिथे उपस्थित राहायचे काही कारण नाही, असे श्रीकांत शिंदे यांनी स्पष्ट केले. women’s reservation.

    याच दरम्यान अरविंद सावंत यांनी माध्यमांसमोर लेखी देऊन उद्धव ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची ग्वाही दिली आणि ऑपरेशन टायगरच्या बातम्या देणाऱ्या माध्यमांवर खटला दाखल करायची दमबाजी केली.

    ऑपरेशन टायगर होऊन ना होवो, माध्यमांनी त्या दुधखुळ्या बातम्या चघळून घेतल्या. पण या सगळ्या प्रकारात भाजप करत असलेल्या खऱ्या ऑपरेशन कडे माध्यमांचे दुर्लक्ष झाले भाजपने सुरू केलेल्या ऑपरेशनच्या बातम्याच देऊ शकली नाहीत.

    – भाजपचा तर महिला आरक्षणावर भर

    भाजपने राष्ट्रीय पातळीवर एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम हाती घेतला असून येत्या 16 17 आणि 18 एप्रिल रोजी होणाऱ्या संसद अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या आरक्षणासंदर्भात भव्य मेळावे आयोजित केले आहेत. देशाचे राजकारण आमुलाग्र बदलायचा घाट या निमित्ताने भाजपने घातला आहे. भाजप आता जुन्या राजकीय प्रयोगांपेक्षा नव्या राजकीय प्रयोगांवर भर देणार आहे.

    – प्रचंड प्रमाणावर महिला मेळावे

    भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी आजच दिल्लीतल्या भाजप मुख्यालयात भाजपच्या सर्व प्रदेशाध्यक्षांची आणि केंद्रीय पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली असून या बैठकीत राष्ट्रीय पातळीवरच्या महिला मेळाव्यांचे नियोजन करण्यात येत आहे. देशातल्या विविध राज्यांमध्ये विविध स्तरांवर हे महिला मेळावे होणार असून त्यामध्ये 33% महिला आरक्षणाचा मुद्दा अतिशय आक्रमकपणे पुढे आला जाणार आहे. संसदेच्या विशेष अधिवेशनात 33 % आरक्षण मंजूर करून घेतल्यानंतर पुढच्या वर्षभरातच लोकसभेच्या आणि विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना होईल. लोकसभेचे 543 मतदारसंघ ते एकदम 816 मतदारसंघ होतील. त्याचबरोबर राज्यांच्या विधानसभांच्या मतदारसंघांमध्ये ही मोठी वाढ होईल. त्यामुळे संसदीय राजकारणाची व्याप्ती प्रचंड वाढेल. त्यामध्ये महिला या अत्यंत महत्त्वपूर्ण घटकाचा निर्णायक समावेश होईल. घराणेशाहीचे पक्ष शाबूत राहिले तरी ते निर्णायक स्थितीत होणार नाहीत. घराणेशाहीचे खासदार आणि आमदार संपूर्ण राजकारण नियंत्रित करू शकणार नाहीत उलट नव्या घटकांच्या नियंत्रणाखाली त्यांना राहावे लागेल.

    – आमुलाग्र बदलाची तयारी

    देशाचे आतापर्यंतचे राजकारण पारंपारिक घटकांवर टिकून राहिले, त्यात मोठ्या प्रमाणावर बदल होईल. याच बदलाची तयारी भाजप केंद्रीय पातळीपासून थेट गाव पातळीपर्यंत करतोय. भाजपचे हे खरे ऑपरेशन येत्या दोन वर्षांमध्ये पूर्ण होईल पण त्या विषयावर मराठी माध्यमांनी बातम्याच दिल्या नाहीत. कारण भाजपचे खरे ऑपरेशन कळण्याची आणि समजून घेण्याची मराठी माध्यमांमध्ये क्षमताच उरलेली नाही. बारामती, मातोश्री आणि ठाणे या पलीकडे त्यांची बुद्धीच गेली नाही. म्हणून त्यांना भाजपच्या खऱ्या ऑपरेशनच्या बातम्या देता आल्या नाहीत.

    BJP programs nationwide on women’s reservation.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Assam assembly : आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.21% मतदान; पुद्दुचेरीमध्ये 90% मतदान; केरळममध्ये 49 वर्षात दुसऱ्यांदा विक्रमी मतदानाची नोंद

    PM Modi : मोदींच्या हत्येचा कट, बिहारमधून 3 जणांना अटक; अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA च्या संपर्कात होते, हल्ल्यासाठी पैशांची मागणी

    PM Modi : मोदींच्या हत्येचा कट, बिहारमधून 3 जणांना अटक; अमेरिकन गुप्तहेर संस्था CIA च्या संपर्कात होते, हल्ल्यासाठी पैशांची मागणी