श्रीनगर – दक्षिण काश्मिरमधील कुलगाम जिल्ह्यात ब्राझलू परिसरात दहशतवाद्यांनी भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या केली.जावेद अहमद दार असे या कार्यकत्याचे नाव असून दहशतवाद्यांनी त्याच्या निवासस्थानी त्याच्यावर गोळीबार केला.BJP person killed by terrorist in Kashmir
तो भाजपचा कुलगाम मतदारसंघाचा प्रभारी होता. हल्ल्याचे वृत्त समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. दहशतवाद्यांच्या शोधासाठी मोहीम हाती घेण्यात आली आहे.गेल्या काही दिवसात भाजपच्या नेत्यांना दहशतवाद्याकडून लक्ष्य केले जात आहे.
आतापर्यंत राज्यात तब्बल सहा भाजप कार्यकर्त्यांची हत्या करण्यात आली आहे. यामागील कारणांचा पोलिसही वेध घेत आहेत. राज्यात भाजपच्या नेत्यांची सुरक्षा आता वाढवण्यात आली आहे.
BJP person killed by terrorist in Kashmir
महत्वाच्या बातम्या
- ‘पेगॅसस’प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दिलासा, संवेदनशील माहिती देण्याची गरज नाही
- राष्ट्रीय महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षपदी नेट्टा डिसूझा, सुस्मिता देव यांनी राजीनामा दिल्याने घाईघाईत नियुक्ती
- माजी वनमंत्री संजय राठोड अडचणीत, शरीरसुख मागितल्याचा आरोप करणाऱ्या महिलेचा जबाब नोंदविला
- उदयनराजे भोसले यांना कोरोनाची लागण, आईला भेटण्यासाठी आले होते अधिवेशन अर्ध्यावर सोडून