विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय जनता पार्टीचे नेते सी टी रवी यांनी आणखी एक विवादास्पद विधान केले आहे. त्यांनी सोमवारी भारत हे एक हिंदू राष्ट्र आहे असे म्हंटले आहे. रवी म्हणाले की, काँग्रेस पक्ष हा लोकांना समाधानी ठेवण्याचे राजकारण पहिल्यापासून करत आहे. पण त्यांनी आता पूजा करणे व हिंदू समाजाला समाधानी करण्यासाठी देवळांना भेटी देणे चालू केले आहे.
BJP leader said India will always be a ‘Hindu Rashtra’
सी टी रवी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव देखील आहेत. ते पुढे म्हणाले की, “काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी फक्त निवडणूक काळात नव्हे तर नियमित देवळात गेले पाहिजे. इंडिया हे हिंदू राष्ट्र होते, आहे राहील. याआधी काँग्रेस अल्पसंख्यांकांना समाधानी करण्याचे राजकारण करत होते. पण आता त्यांना कळले आहे की हिदू एकत्र आले आहेत. आता ते दुर्गा पूजा करत आहेत व मंदिरांना भेटी देत आहेत. जर तुम्ही हिंदू असाल तर फक्त निवडणूक काळात असे करू नका. नियमित मंदिरात गेले पाहिजे.”
सी टी रविंचे हे विधान वृत्त संस्था ANI कडून आले आहे. सी टी रवी यांची विवादास्पद विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीपण त्यांनी AIMIM (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen) आणि सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) आणि तालिबान यांच्या विचारसरणीशी तुलना केली होती. “AIMIM म्हणजे कर्नाटकातील तालिबान सारखे आहे. AIMIM आणि SDPI यांची विचारसरणी तालिबान सारखी आहे. कलबूर्गीमधील जनता ही विचारसरणी मान्य करणार नाही.” ANI ने कर्नाटकातील कलबुर्गी येथे ३१ ऑगस्ट रोजी हे भाषण केल्याचे वृत्त दिले आहे.
BJP leader said India will always be a ‘Hindu Rashtra’
महत्त्वाच्या बातम्या
- जिंदगी ना मिलेगी दोबारा सिनेमामुळे स्पेनच्या टुरिझम व्यवसायात झाली होती 32% नी वाढ ?
- दुर्गा सन्मान: द फोकस इंडियाच्या वतीने पहिला ‘दुर्गा सन्मान’ पुरस्कार सोहळा थाटामाटात संपन्न ; प्रशांत दामलेंनी द फोकस इंडियाला शुभेच्छा देत केले कौतुक
- चोर समजून २६ वर्षीय तरुणाची हत्या; तीन आरोपींना अटक
- आईस्क्रीम खाणे आता महागणार!, १८ टक्के जीएसटी लागू