पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.BJP has started preparations for five state elections, a meeting of senior leaders will be held on Saturday
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पुढील वर्षी होणाऱ्या पाच राज्यांतील निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने आत्तापासूनच तयारी सुरू केली आहे. यासाठी शनिवारी भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची बैठक होणार आहे. यामध्ये अनेक केंद्रीय मंत्र्यांचाही समावेश आहे.या राज्यांतील राजकारण आणि शासकीय योजनांवर बैठकीत चर्चा होणार आहे.
भाजपाचे राष्टीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा, राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन, नरेंद्रसिंग तोमर, स्मृति इराणी आणि किरण रिजीजू हे या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची तयारी हाच या बैठकीचा मुख्य अजेंडा आहे असे एका ज्येष्ठ नेत्याने सांगितले.
पुढील वर्षी उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणीपूर आणि गोवा या पाच राज्यांच्य निवडणुका होणार आहेत. पंजाबचा अपवाद वगळता चारही राज्यांत भाजप सत्तेवर आहे. त्यामुळे येथील नेत्यांशीही सातत्योन बैठका सुरू आहेत. यामधील उत्तर प्रदेश राज्य हे भारतीय जनता पक्षासाठी अत्यंत महत्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ मध्ये सत्तेवर आल्यापासून देशातील सर्वाधिक लोकसंख्येच्या या राज्यात भाजप सर्वात मोठा पक्ष आहे.
८४ कोस परिक्रमा हा जवळपास ३०० किलोमीटर लांब तीर्थ मार्ग आहे. श्रीकृष्णाच्या प्रसिद्ध स्थानांची पूजा करण्यासाठी भक्तांना जवळपास ४५ दिवस लागतात.जे पी नड्डा आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली भाजप मुख्यालयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत सरकारचे वरिष्ठ मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी यांच्यात आगामी पाच राज्यांच्या निवडणुकीत रणनीतीवर चर्चा होईल. है बैठकही सकाळी ११.०० वाजता बोलावण्यात आली आहे.
BJP has started preparations for five state elections, a meeting of senior leaders will be held on Saturday
महत्त्वाच्या बातम्या
- जम्मू- काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मुर्खपणा, ओमर अब्दुल्ला यांची टीका
- राफेल विमानांचा वेगवान विक्रम, १२ तासांत कापले १७ हजार किलोमीटरचे अंतर
- पुणेकरांना उपदेशाचे डोस स्वत : च्या मतदारसंघात गर्दी अलोट, गृहमंत्री वळसे-पाटील यांच्याच कार्यक्रमात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषीकेशही अडचणीत, पैसे फिरविण्याचे केले काम
- महाराष्ट्रातील ५ झेडपी निवडणूकांविरोधात सुप्रिम कोर्टात जाण्याची ओबीसी नेते प्रकाश शेंडगेंची घोषणा