केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) 6 एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. भाजप नेते अरुण सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उद्या ठीक 10 वाजता पंतप्रधान मोदी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील.BJP Foundation Day 2022: BJP made preparations for Foundation Day, Prime Minister Modi will also address, Social Justice fortnight
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : केंद्रात सत्तेत असलेला भारतीय जनता पक्ष (भाजप) 6 एप्रिल रोजी आपला स्थापना दिवस साजरा करणार आहे. त्यासाठी पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर तयारी करण्यात आली आहे. भाजप नेते अरुण सिंह यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, उद्या ठीक 10 वाजता पंतप्रधान मोदी देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करतील.
मंत्र्यांपासून ते आमदारही होतील सहभागी
पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती देताना अरुण सिंह म्हणाले की, भाजपच्या सर्व विभागांमध्ये, जिल्हा कार्यालयात ध्वजारोहण करण्यात येणार आहे. त्याचबरोबर मिरवणूक काढण्यात येणार आहे. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री, आमदार कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमात सहभागी होतील. यासोबतच राष्ट्रीय अध्यक्ष भाजप मुख्यालयावर ध्वजारोहण करतील आणि डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्यायजी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतील. येथे रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात येणार आहे.
सामाजिक न्याय पंधरवड्याचे आयोजन
भाजप नेत्याच्या वतीने सांगण्यात आले की, पक्षाने निर्णय घेतला आहे की 7 एप्रिल ते 20 एप्रिलदरम्यान देशभरात सामाजिक न्याय पंधरवडा साजरा केला जाईल. सामाजिक न्याय पंधरवड्याच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना जिल्ह्या-जिल्ह्यापर्यंत आणि मंडळांपर्यंत नेण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करणार आहेत.
12 एप्रिल हा दिवस लसीकरण दिन म्हणून साजरा करणार आहोत. 13 एप्रिल रोजी देशभरात गरीब कल्याण अन्न योजनेशी संबंधित कार्यक्रम होणार आहेत. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त 14 एप्रिल रोजी बूथ स्तरावर अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. 15 एप्रिल रोजी अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी केलेले कार्य आणि त्यासोबतच समाजासाठी विशेष कार्य करणाऱ्या अनुसूचित जमाती समाजातील लोकांचा गौरव करण्याचे कामही भाजपचे कार्यकर्ते करणार असल्याचे अरुण सिंह यांनी सांगितले.
6 एप्रिल 1980 रोजी झाली होती भाजपची स्थापना
भारतीय जनता पक्षाची स्थापना 6 एप्रिल 1980 रोजी झाली. 1951 मध्ये श्यामा प्रसाद मुखर्जी यांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघातून या नव्या पक्षाचा जन्म झाला. 1977 मध्ये आणीबाणीच्या घोषणेनंतर जनसंघ इतर अनेक पक्षांमध्ये विलीन झाला आणि जनता पक्षाचा जन्म झाला. 1977 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पक्षाने काँग्रेसकडून सत्ता हिसकावून घेतली आणि 1980 मध्ये जनता पक्ष विसर्जित करून भारतीय जनता पक्षाचा पाया घातला गेला.
BJP Foundation Day 2022: BJP made preparations for Foundation Day, Prime Minister Modi will also address, Social Justice fortnight
महत्त्वाच्या बातम्या
- दक्षिण कोरियाला अणुबॉम्बने नष्ट करण्याची धमकी; उत्तर कोरियाचा हुकूमशहाची बहिण किम यो जोंग
- पेट्रोल आणि डिझेलच्या किमती पुन्हा भडकणार; कच्च्या तेलाच्या किमती वाढल्याने दरवाढीचे संकट
- Sanjay Raut ED : ईडीच्या कारवाईचे मुंबईत घुमावदार “जोर”; राऊत – पवारांच्या रंगताहेत टी – डिनर डिप्लोमसीच्या “बैठका”!!
- मॉडरेटरने केला लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग