• Download App
    मॉडरेटरने केला लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग|Exam supervisor molestation lady teacher in katraj area

    मॉडरेटरने केला लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग

    पेपर तपासणीस पर्यवेक्षकानेच ( मॉडरेटर) लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना सातारा रस्ता परिसरातील एका डेअरीजवळ घडली.


    विशेष प्रतिनिधी

    पुणे – पेपर तपासणीस पर्यवेक्षकानेच ( मॉडरेटर) लेक्चरर शिक्षिकेचा विनयभंग केल्याची घटना ४ एप्रिलला दुपारी अडीचच्या सुमारास सातारा रस्ता परिसरातील एका डेअरीजवळ घडली.याप्रकरणी विकास पवार (रा. आंबेगाव खुर्द,पुणे ) याच्याविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Exam supervisor molestation lady teacher in katraj area

    फिर्यादी महिला लेक्चरर असून त्यांच्याकडे १२ वीचे पेपर तपासणीसाठी दिले आहेत. पेपर तपासणीस यांच्यावर पर्यवेक्षणासाठी विकास पवार मॉडरेटर म्हणून नियुक्त आहेत. त्यामुळे अडचणींच्यावेळी फिर्यादी लेक्चरर आणि पवार यांच्यात फोनवर संवाद होत होता.



    सोमवारी पेपर तपासणीचे काम संपल्यानंतर त्याने महिलेला लस्सी पिण्याच्या बहाण्याने डेअरीकडे नेले. त्यावेळी त्यांच्या अंगावर हात टाकून विनयभंग केला. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस तपास करीत आहेत.

    Exam supervisor molestation lady teacher in katraj area

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Sharad Pawar : शरद पवार यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; प्रकृती पूर्णपणे ठणठणीत, डॉक्टरांचा पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला

    Rohit Pawar : 2029 मध्ये पवार vs पवार होऊ शकते; सुनेत्रा काकींना आमचा भावनिक पाठिंबा, बारामती पोटनिवडणुकीवर रोहित पवारांचे वक्तव्य

    बारामतीत विक्रमी मताधिक्क्याचा विषय राहिला बाजूला; मतदानाच्या दिवशीच रोहित विरुद्ध इतर पवारांचा रंगला कलगीतुरा!!