• Download App
    मीसा भारती यांनी मोदींबाबत केलेल्या 'त्या' वक्तव्यावर भाजपचा पलटवार! BJP counterattacks on Misa Bhartis renunciation statement regarding Modi

    मीसा भारती यांनी मोदींबाबत केलेल्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा पलटवार!

    जाणून घ्या, मीसा भारती नेमकं काय म्हणाल्या आहेत?

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : आरजेडी प्रमुख लालू प्रसाद यादव यांची कन्या मीसा भारती यांनी पंतप्रधान मोदींबाबत दिलेल्या वक्तव्यामुळे बिहारचे राजकारण तापले आहे. मीसा भारती यांच्या वक्तव्यावर आज भाजपने जोरदार पलटवार केला आहे.

    भाजपने टोमणा मारला आणि म्हटले की, “अरे मिसा जी… खूप राग येतोय का, खूप राग येतोय. सध्या तर फक्त ब्रिजवासनच्या फार्महाऊस आणि 2-4 मालमत्ता जप्त केल्या आहेत ना. कुठून आले हे सगळं? हा कुबेराचा आशीर्वाद फक्त लालू कुटुंबावर आणि त्यांच्या मुला-मुलींवरच आहे.”


    लालू प्रसाद यादव यांना पुन्हा तुरुंगात जावे लागणार? सर्वोच्च न्यायालय जामीनाविरोधातील CBIच्या याचिकेवर सुनावणीस तयार!


    पुढे, भाजपचे प्रवक्ते अजय आलोक म्हणाले, “जर सरकार स्थापन झाले तर पंतप्रधान आणि भाजपचे सर्व नेते आणि त्यांचे सहकारी तुरुंगात जातील, असं सांगितं जात आहे. अरे देवा, काय पण मनसुबे आहेत, काय मुंगेरीलालची स्वप्नं आहेत. सरकार बनवण्याची स्वप्न दिवसाही पडतात का? काम करा.

    तसेच, अगोदर जिथे इंडी आघाडीचे सरकार आहे, तेथल्या सर्व भाजप नेत्यांना तुरुंगात टाकून दाखवा, जे भ्रष्टाचारात गुंतलेले आहेत, तिथे राजवट आहे. या देशात कायदाच चालेल आणि भ्रष्टाचार करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. असंही म्हटलं आहे.

    मीसा भारती यांनी हे वक्तव्य केले होते

    पाटलीपुत्र लोकसभा मतदारसंघातील आरजेडी उमेदवार मीसा भारती यांनी मणेर येथे म्हटले होते की, जर जनतेचा आशीर्वाद आणि इंडी आघाडी सरकार स्थापन झाले, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते भाजप नेते तुरुंगात जातील.

    BJP counterattacks on Misa Bhartis renunciation statement regarding Modi

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार

    Raihan Vadra Engagement : प्रियंका गांधी यांचा मुलगा रेहानचा मैत्रीण अवीवा बेगसोबत साखरपुडा; दोघांनाही फोटोग्राफी-फुटबॉलची आवड

    ‘G RAM G Act : जी राम जी’ मुळे राज्यांना ₹17,000 कोटींचा फायदा; उत्तर प्रदेश, महाराष्ट्र आणि बिहार सर्वात मोठे लाभार्थी