विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : विधानसभा अधिवेशनात पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांना शिवीगाळ केल्याचा आरोप करत निलंबित करण्यात आलेल्या १२ आमदारांनी या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.Bjp challenges suspension of 12 MLAs in Supreme Court
आमदारांवरील निलंबन कारवाई ही विरोधी आमदारांची संख्या कमी करून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप भाजपाने केला आहे.
याबाबत भाजपाच्या चार-चार आमदारांकडून याचिका दाखल केल्या आहेत.
अंतिम निर्णय होईपर्यंत निलंबन कारवाईला अस्थायी स्थगिती देऊन सर्व आमदारांना त्यांचे अधिकार बहाल केले जावेत, असे याचिकेत म्हटले आहे.
महाराष्ट्र्र विधानसभेच्या दोन दिवसांच्या अधिवेशनात या सर्व आमदारांविरोधात विधिमंडळ कामकाज मंत्री अनिल परब यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला होता.
निलंबित आमदारांनी पीठासीन अधिकारी भास्कर जाधव यांच्याशी गैरवर्तन केले, असे त्यात म्हटले होते. अध्यक्षांच्या दालनात जाधव यांना आई-बहिणीवरून शिव्या दिल्याचा आरोप महाविकास आघाडी सरकारने केला होता.
मात्र,भाजपाच्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार, अध्यक्षांकडून निलंबित सर्व आमदारांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जायला हवी होती. एक वषार्साठी निलंबन हा खूप जास्त काळ आहे. सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्यात जोरदार वाद होणे हा लोकशाहीचा भाग आहे. परंतु, ही कारवाई केली केवळ विरोधकांची ताकद कमी करण्यासाठी केल्याचा भाजपाचा आरोप आहे.
आशीष शेलार, संजय कुटे, गिरीश महाजन, अभिमन्यु पवार, अतुल भातखळकर, हरीश पिंपळे, योगेश सागर, पराग अळवणी, जय कुमार रावत, राम सातपुते, बंटी भांगड़िया आणि नारायण कुचे या बारा आमदारांना निलंबित करण्यात आले आहे.
Bjp challenges suspension of 12 MLAs in Supreme Court
महत्त्वाच्या बातम्या
- Maharashtra Floods : राज्यातील गंभीर पूर संकटावर राज ठाकरे यांचं मनसैनिकांना आवाहन, तातडीने मदत पोहोचवा
- महाराष्ट्राच्या स्थितीवर केंद्राचे सातत्याने लक्ष, NDRFची 26 पथके, 4 हेलिकॉप्टर्स, लष्करही दाखल; देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय गृह राज्यमंत्री, मुख्यमंत्र्यांशी चर्चा
- Raj Kundra Pornography Case : राज कुंद्राच्या पॉर्न साम्राज्याचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन? १२१ व्हिडिओंसाठी १२ लाख डॉलर्सचा रेट, मुंबई पोलिसांची माहिती
- Maharashtra Landslide : राज्यात अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे