भापच्या वरिष्ठ नेतृत्वाने माफी मागावी अशी मागणी काँग्रेसकडून केली जात आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : Congress दिल्लीतील कालकाजी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी काँग्रेस सरचिटणीस आणि खासदार प्रियांका गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले आहे. बिधुडी यांच्या वक्तव्यावर काँग्रेसने जोरदार पलटवार केला आहे. काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेत यांनी रमेश बिधुडी यांचे वक्तव्य महिलाविरोधी असल्याचे म्हटले आहे.Congress
X वर व्हिडिओ शेअर करताना त्या म्हणाल्या, “भाजप प्रचंड महिलाविरोधी आहे. भाजपचे माजी खासदार आणि कालकाजी मतदारसंघातील त्यांचे उमेदवार रमेश बिधुडी यांनी प्रियंका गांधी यांच्याबाबत केलेले विधान केवळ लाजिरवाणेच नाही तर त्यांची महिलांबद्दलची मानसिकता देखील दर्शवते. सभागृहात आपल्या सहकारी खासदाराला शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीकडून आणखी काय अपेक्षा करता येईल.
सुप्रिया श्रीनेत पुढे म्हणाल्या, “भाजपच्या महिला नेत्या, महिला विकास मंत्री, नड्डाजी किंवा खुद्द पंतप्रधान मोदी या चुकीच्या भाषेवर आणि विचारसरणीवर काही बोलतील का? खरे तर मोदीजी हेच या भाषेचे आणि महिलांविरोधातील विचारांचे जनक आहेत. निवडणुकीच्या सभेत ते मंगळसूत्र, मुजरा असे शब्द बोलतात, तेव्हा त्यांच्या या विचारसरणीबद्दल त्यांनीच नाहीतर त्यांच्या शीर्ष नेतृत्वाने माफी मागावी.
प्रियांका गांधी वढेरा यांच्यबाबत त्यांनी दिलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये बिधुढी म्हणतात, लालूंनी बिहारचे रस्ते हेमा मालिनी यांच्या गालासारखे बनवण्याचे आश्वासन दिले होते, पण ते तसे करू शकले नाहीत. तर ओखला आणि संगम विहारचे रस्ते जसे बांधले गेले आहेत, त्याचप्रमाणे मी तुम्हाला खात्री देतो. तसेच कालकाजीतील सर्व रस्ते प्रियंका गांधींच्या गालासारखे बनवणार आहे.
BJP candidates controversial statement about Priyanka Gandhi, Congress outraged!
महत्वाच्या बातम्या
- Nitin Gadkari : नितीन गडकरी पुन्हा स्पष्टच बोलले ; म्हणाले- राजकारणात वापरा आणि फेकण्याचे तत्वज्ञान
- देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक सामनात कौतुक होणे महाराष्ट्राचे संस्कार, चंद्रशेखर बावनकुळे यांचे मत
- Ajitdada : धनंजय मुंडेंविरुद्ध सगळे एकवटले तरी अजितदादा अजून नामानिराळे!!
- America : गोळीबाराने अमेरिका पुन्हा हादरली! वॉशिंग्टन डीसीमध्ये हल्ला, 5 जखमी