• Download App
    आता विमानतळांवर चेहराच तुमची कागदपत्रे, पुण्यासह सहा ठिकाणी ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण बसविणार|Biometric devices will now be installed at airports in six places, including Pune, to face your documents at airports.

    आता विमानतळांवर चेहराच तुमची कागदपत्रे, पुण्यासह सहा ठिकाणी ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण बसविणार

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : विमानप्रवास करताना एखादे कागदपत्र जरी गहाळ झाले तरी अडचण होते. मात्र, आता विमानतळांवर चेहराच तुमची ओळख पटविणार आहे. पुण्यासह सहा विमानतळांवर चेहऱ्यावरून प्रवाशांची ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण (बीबीएस) बसविण्यात येणा असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह यांनी लोकसभेत दिली.Biometric devices will now be installed at airports in six places, including Pune, to face your documents at airports.

    सिंह म्हणाले की, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू, वाराणसी, विजयवाडा या विमानतळांचाही या योजनेत समावेश आहे. प्रवाशांची ओळख पटविणारे बायोमेट्रिक उपकरण काही विमानतळावर याआधीच बसविण्यात आले आहे. आता देशातील सर्वच विमानतळांवर ही उपकरणे बसविण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.



    विमानतळांवर अद्ययावत यंत्रसामग्री बसविण्यासाठी येत्या पाच वर्षांत २५ हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. देशात काही नवे विमानतळ उभारले जात असून, तिथेही ही योजना कार्यान्वित होईल. २०२० साली दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही बायोमेट्रिक यंत्रणा (बीबीएस) बसविण्यात आली. जपानसह आणखी काही देशांमध्येही हेच तंत्रज्ञान वापरण्यात येत आहे.

    कोरोनाची साथ सुरू असल्यामुळे प्रत्येक प्रवाशांची कागदपत्रे बारकाईने तपासणे, त्याच्या आरोग्याविषयी सर्व माहिती नीट जाणून घेणे यात विमानतळ अधिकाऱ्यांचा खूप वेळ जातो. त्यामुळे विमानतळावर उतरलेल्या व विमान प्रवासासाठी सज्ज झालेल्या प्रवाशांच्या सध्या लांबच लांब रांगा तपासणी कक्षासमोर लागलेल्या असतात.

    चेहऱ्यावरून प्रवाशांची ओळख पटविणारे बायोमेट्रिक तंत्रज्ञान जगभरातील विमानतळांवर वापरले जात आहे. त्यामुळे प्रवाशांचे पासपोर्ट किंवा विमान तिकिटांची प्रत्यक्ष तपासणी करण्याची गरज उरत नाही. त्याच तपासणीतंत्राचे अनुकरण आता भारतातील विमानतळांवर करण्यात येईल.

    Biometric devices will now be installed at airports in six places, including Pune, to face your documents at airports.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य