पंजाबमधील शेतीमध्ये काम करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजुरांना जादा पगाराचे आमिष दाखवून आणले जाते. त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी जास्त काम करावे म्हणून त्यांना अंमली पदार्थही दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. Bihar-Uttar Pradesh laborers resort to forced labor in Punjab, farmers give drugs to make them work harder, Union Home Ministry says
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : पंजाबमधील शेतीमध्ये काम करण्यासाठी बिहार, उत्तर प्रदेशातून मजुरांना जादा पगाराचे आमिष दाखवून आणले जाते. त्यांच्याकडून वेठबिगारी करून घेतली जाते. ऐवढेच नव्हे तर त्यांनी जास्त काम करावे म्हणून त्यांना अंमली पदार्थही दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबत पंजाबच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितले आहे. पंजाबमधील सीमेवरील जिल्ह्यात हा गंभीर प्रश्न बनला आहे. याठिकाणी अनेक वेठबिगार मजूर शेतकऱ्यांकडेकाम करत आहेत. त्यांच्याशी अत्यंत अमानवी पध्दतीने वागले जाते,असेही केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे.
बिहार आणि उत्तर प्रदेशातील दुर्गम भागातील अत्यंत गरीब कुटुंबांतील या मजुरांवर वेठबिगाराचे जिणे जगण्याची वेळ आली आहे.मानवी तस्करीचे मोठे सिंडीकेट यासाठी काम करत आहे. गावातून या मजुरांना चांगल्या पगाराचे आमिष दाखवून पंजाबला नेले जाते. मात्र, तेथे त्यांचे शोषण होते. या मजुरांना अंमली पदार्थांची सवय लावली जाते. त्यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक खच्चीकरण होते.
पंजाबचे मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालक यांना लिहिलेल्या या पत्रात केंद्रीय गृह मंत्रालयाने म्हटले आहे की हा अत्यंत जटील प्रश्न बनला आहे. त्यामध्ये मानवी तस्करी, वेठबिगारी आणि मानवाधिकारांचे हनन होत आहे. त्यामुळे तातडीने याची दखल घ्यावी.
Bihar-Uttar Pradesh laborers resort to forced labor in Punjab, farmers give drugs to make them work harder, Union Home Ministry says
महत्त्वाच्या बातम्या
- पेट्रोल- डिझेलवर लवकरच मिळेल दिलासा, ओपेक देशांची तेल उत्पादन वाढविण्याला सहमती
- आसाममध्ये भाजप आमदाराच्या कारमध्ये कसे आले EVM?, आयोगाचा वस्तुनिष्ठ अहवाल; चार अधिकारी निलंबित, एका बूथवर पुन्हा मतदान
- द्रमुक नेते स्टालिन यांच्या जावयाच्या ठिकाणांवर प्राप्तिकर विभागाची छापेमारी, मोठी रोकड लपवल्याचा संशय
- Pulwama Encounter : पुलवामात सुरक्षा दलाचे मोठे यश, चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा
- सचिन तेंडुलकर रुग्णालयात दाखल, 27 मार्च रोजी झाला होता कोरोनाचा संसर्ग