पश्चिम बंगालमध्ये चौकशीसाठी गेलेल्या बिहारमधील किशनगंज टाऊनचे इन्स्पेक्टर अश्विनी कुमार यांची जमावाने भीषण हत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. अश्विनीकुमार यांना सोडून पळून आलेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.Bihar police officer killed by mob in West Bengal, mother killed in child molestation, seven policemen suspended
विशेष प्रतिनिधी
किशनगंज: पश्चिम बंगालमध्ये चौकशीसाठी गेलेल्या बिहारमधील किशनगंज टाऊनचे इन्स्पेक्टर अश्विनी कुमार यांची जमावाने भीषण हत्या केली. मुलाच्या मृत्यूच्या धक्याने त्यांच्या आईचाही मृत्यू झाला. अश्विनीकुमार यांना सोडून पळून आलेल्या सात पोलीस कर्मचाऱ्यां ना निलंबित करण्यात आले आहे.
किशनगंजला लागून असलेल्या पश्चिम बंगालच्या पंतपाडा येथे चौकशीसंदर्भात पोलीस दलासमवेत गेलेल्या इन्स्पेक्टर अश्विनी कुमार यांच्यावर ग्रामस्थांनी हल्ला केला. जमावाने केलेल्या मारहाणीत त्यांचा मृत्यू झाला.
भीषण मॉब लिंचिंगनंतर पुन्हा त्यांच्या घरी शोककळा पसरली आहे. मुलाच्या हत्येचे दु:ख त्यांच्या आईला सहन झाले नाही. अश्विनी कुमार यांचा मृतदेह जेव्हा त्यांच्या घरी पोहोचला तेव्हा तिच्या आईला ते दृश्य पाहणं शक्य झाले नाही. मुलाचा मृतदेह पाहून आईनेही आपला प्राण सोडला. त्यामुळे अश्विनी कुमार यांच्या घरात दोन मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
पोलिस अधिकारी आणि पोलिस दल तेथे उपस्थित होते. त्यांनी एक गोळी झाडली असती तर अश्विनीकुमार गर्दीच्या तावडीतून वाचले असते. पश्चिम बंगालच्या दिनाजपूर येथे जमावाने पोलीस अश्विनी कुमार यांना घेराव घातला असता हे पोलीस तेथून पळून आले.
अश्विनीकुमार यांच्यासोबत असलेल्या सर्कल इन्स्पेक्टर मनीष कुमार यांच्यासह सात पोलिस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.अश्वनी कुमार यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
अटक केलेल्या आरोपींमध्ये फिरोज आलम, त्याचा भाऊ अबुजर आलम आणि त्याची आई सहयानूर खातून यांचा समावेश आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज हा घटनेतील मुख्य आरोपी आहे.
पूर्णियाचे आयजी आणि किशनगंजचे एसपी घटनास्थळावर तळ ठोकून आहेत. त्याच वेळी, डीजीपी एसके सिंघल यांनी या संदर्भात पश्चिम बंगालच्या डीजीपीशी संपर्क साधला आहे. बंगालच्या डीजीपीने पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.