• Download App
    नितीश कुमारांना मोठा धक्का, 'JDU'प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा Big shock to Nitish Kumar JDU state vice president Lalan Paswan resigns

    नितीश कुमारांना मोठा धक्का, ‘JDU’प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांचा राजीनामा

    राजदसोबत युती आणि दलितांवरील अत्याचाराचा आरोप करत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

    विशेष प्रतिनिधी

    पाटणा : बिहारमधील जेडीयूचे माजी आमदार आणि सध्याचे प्रदेश उपाध्यक्ष लालन पासवान यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. राजदसोबत युती आणि दलितांवरील अत्याचाराचा आरोप करत त्यांनी हल्लाबोल केला आहे. राजीनाम्यात त्यांनी आरजेडीचे वर्णन बिहारमध्ये दहशत आणि गुंडा राजवट प्रस्थापित करणारा पक्ष असे केले आहे. Big shock to Nitish Kumar JDU state vice president Lalan Paswan resigns

    पक्षाध्यक्षांना पाठवलेल्या पत्रात लालन पासवान लिहितात, “बिहारमध्ये दहशत आणि गुंडा राजवट प्रस्थापित करणाऱ्या लालू प्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी झालेल्या तडजोडीनंतर दलितांवर हत्या, बलात्कार आणि छळाच्या घटना वाढत आहेत. त्याचा प्रतिबंधासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याच्या निषेधार्थ, मी जनता दल (यू) च्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे.”

    गेल्या महिन्यात राष्ट्रीय लोक जनता दल (आरएलजेपी) प्रमुख उपेंद्र कुशवाह यांनी जेडीयूमध्ये फूट पडणार असल्याचा दावा केला होता. जरी ते एकाच वेळी तुटले नाही तरी त्याचे तुकडे तुकडे होऊ शकतात, परंतु ते तुटणे निश्चित आहे. असं ते म्हणाले होते.  यानंतर काही वेळातच जेडीयूचे ज्येष्ठ नेते आणि माजी विधान परिषद सदस्य रणवीर नंदन यांनी पक्षाचा राजीनामा देण्याची घोषणा केली होती.

    Big shock to Nitish Kumar JDU state vice president Lalan Paswan resigns

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Awas Yojana 2026 : प्रधानमंत्री आवास योजना 2026: स्वतःचे घर घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण! पात्रता, अर्ज प्रक्रिया, अनुदान आणि संपूर्ण माहिती

    Maharashtra Legislative : द फोकस एक्सप्लेनर : विधान परिषदेत जिंकून नेमके काय मिळते? महाराष्ट्राच्या सत्तासमीकरणावर त्याचा कसा परिणाम होतो?

    MPSC : एमपीएससीच्या लाखो विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! ‘निपुण सेतू’ला मंजुरी; प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना मिळणार नोकरीची नवी संधी