• Download App
    प्रियंका यांच्यावर मोठी जबाबदारी, अनेक राज्यांमध्ये नवे अध्यक्ष, 2024 पूर्वी काँग्रेस मोठ्या बदलांच्या तयारीत|Big responsibility on Priyanka, new president in many states, Congress preparing for big changes before 2024

    प्रियंका यांच्यावर मोठी जबाबदारी, अनेक राज्यांमध्ये नवे अध्यक्ष, 2024 पूर्वी काँग्रेस मोठ्या बदलांच्या तयारीत

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : कर्नाटकातील विजयाने काँग्रेस आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसने आता 2024च्या लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. सर्वप्रथम संघटनात्मक फेरबदलाची योजना आहे. यानुसार काँग्रेस लवकरच राजस्थान, महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये नवीन अध्यक्षांची घोषणा करू शकते. यासोबतच काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांच्यावर पक्ष मोठी जबाबदारी सोपवू शकतो.Big responsibility on Priyanka, new president in many states, Congress preparing for big changes before 2024

    आज तकने सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, काँग्रेस लवकरच ओडिशा, हरियाणा आणि बिहारमध्ये नवीन प्रभारी नियुक्त करेल. यासोबतच महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही प्रभारी बदलण्यात येणार आहेत. खरे तर या दोन राज्यांचे विद्यमान प्रभारी दिनेश गुंडो राव आणि एच के पाटील यांना नुकतेच कर्नाटकच्या सिद्धरामय्या सरकारमध्ये मंत्री करण्यात आले आहे.



    राजस्थानमध्येही मोठ्या बदलांची तयारी

    विशेष म्हणजे लवकरच राजस्थानमध्येही नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावावर शिक्कामोर्तब होऊ शकते. कारण राज्यात अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. याशिवाय तरुण चेहऱ्यांना संधी देण्याच्या उद्देशाने लवकरच काँग्रेसची नवी कार्यकारिणी निवडली जाणार आहे. रायपूरच्या अधिवेशनात याबाबतचा ठरावही मंजूर करण्यात आला.

    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संघटनात्मक फेरबदलाची संपूर्ण प्रक्रिया येत्या एक ते तीन आठवड्यांत पूर्ण होईल. या पदांसाठीच्या उमेदवारांची नावे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यापर्यंत पोहोचली आहेत.

    राजस्थानमध्ये सुरू असलेला वाद थांबणार?

    राजस्थानमध्ये गेहलोत आणि पायलट यांच्यात अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेत्यांनी उघडपणे एकमेकांविरोधात आघाडी उघडली आहे. दुसरीकडे, काँग्रेस राजस्थानचे संकट अनेक महिन्यांपासून पुढे ढकलत आहे.

    भारत जोडो यात्रेत राहुल यांनी दोन्ही नेत्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटक निवडणुकीनंतर दोन्ही नेत्यांशी चर्चाही झाली. अमेरिका दौऱ्यावर जाण्यापूर्वी राहुल गांधी यांनी दोघांची भेट घेतली होती. यादरम्यान पायलट आणि गेहलोत यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न करण्यात आला. जेणेकरून राजस्थान निवडणुकीपूर्वी एकजुटीचा संदेश देता येईल. मात्र, दोन्ही नेते आपापल्या भूमिकेवर ठाम असल्याने अद्याप कोणताही फॉर्म्युला सापडलेला नाही.

    प्रियंका गांधी यांना महत्त्वाची भूमिका

    प्रियंका गांधींनी हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये निवडणूक प्रचाराचे नेतृत्व केले, दोन्ही राज्यांमध्ये काँग्रेसचा विजय झाला. प्रियंका गांधी लवकरच मोठ्या भूमिकेत दिसणार असल्याचे मानले जात आहे. यापूर्वी त्यांना यूपीचे प्रभारी बनवण्यात आले होते. मात्र, राज्यातील पराभवानंतर त्यांना हिमाचल आणि कर्नाटक सोपवले. अशा स्थितीत प्रियांका गांधी उत्तर प्रदेशचा कार्यभार सोडू शकतात, जेणेकरून त्या अन्य राज्यांत लक्ष केंद्रित करू शकतील, असे मानले जात आहे.

    Big responsibility on Priyanka, new president in many states, Congress preparing for big changes before 2024

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य