• Download App
    सुकन्या समृद्घी योजनेला मोठा प्रतिसाद; मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटींची गुंतवणूक। Big response to Sukanya Samrudhi Yojana; 1.05 lakh crore investment till end of May

    सुकन्या समृद्घी योजनेला मोठा प्रतिसाद; मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटींची गुंतवणूक

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : देशभरातील मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. Big response to Sukanya Samrudhi Yojana; 1.05 lakh crore investment till end of May

    सुकन्या समृद्घी योजनेत शून्य ते १० वर्ष असलेल्या मुलीच्या नावाने खाते उघडण्यात येते. त्यावर जमा होणाऱ्या खात्यावर ७.६ टक्के व्याज देण्यात येते.
    बेटी बचाओ बेटी पढाओ या सरकारच्या अभियानाला गती देण्यासाठी जानेवरी २०१५ मध्ये ही योजना सुरु केली होती. त्या द्वारे पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. आता या योजनेत १.०५ लाख कोटी गुंतविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी रक्कम ७५५२२ कोटी होती. त्यात यंदा ४० टक्के वाढ झाली आहे.


    WATCH : सुकन्या समृद्दी योजनेतून मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंत मिळेल आधार


    गुंतवुणूक कशी होते

    • शून्य ते १० या वयोगटातील मुलीचे खाते काढावे
    • त्यामध्ये मासिक किंवा वार्षिक रक्कम भरावी
    • सलग १५ वर्ष हप्ते भरावेत
    • २१ व्या वर्षी खात्यात जमा झालेली रक्कम ७.६ टक्के व्याजाने परत मिळते.
    • पालक १८ व्या वर्षीही रक्कम काढू शकतात
    • कमीत कमी २५० रुपये प्रती महिना या प्रमाणे खाते उघडता येते
    • वर्षाला तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख गुंतवू शकता
    • ही रक्कम ८० सी अंतर्गत आयकर मुक्त आहे
    • या रक्कमेतून तुम्ही मुलीला उच्च शिक्षण देऊ शकता

    Big response to Sukanya Samrudhi Yojana; 1.05 lakh crore investment till end of May

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    UN : नरसंहाराचा इतिहास असलेला पाकिस्तान काश्मीरवर भाषण देतोय; भारताने संयुक्त राष्ट्रात काढली खरडपट्टी

    Falta Assembly : बंगालच्या फालतामध्ये रिव्होटिंग; फेरमतदानानंतर तब्बल 87% मतदान; 24 मे रोजी निकाल, टीएमसी उमेदवार गायब, घराला कुलूप

    Gujarat : गुजरात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये होणार; 2029 मध्ये ‘वन नेशन, वन इलेक्शन’ची अंमलबजावणी झाल्यास 2034 पुन्हा निवडणुका