वृत्तसंस्था
नवी दिल्ली : देशभरातील मुलींचे भवितव्य सुरक्षित करण्यासाठी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सुकन्या समृद्धी योजना सुरु केली. या योजनेला भरघोस प्रतिसाद मिळाला असून मे अखेरपर्यंत १.०५ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. Big response to Sukanya Samrudhi Yojana; 1.05 lakh crore investment till end of May
सुकन्या समृद्घी योजनेत शून्य ते १० वर्ष असलेल्या मुलीच्या नावाने खाते उघडण्यात येते. त्यावर जमा होणाऱ्या खात्यावर ७.६ टक्के व्याज देण्यात येते.
बेटी बचाओ बेटी पढाओ या सरकारच्या अभियानाला गती देण्यासाठी जानेवरी २०१५ मध्ये ही योजना सुरु केली होती. त्या द्वारे पालकांमध्ये मुलींच्या शिक्षणासाठी जनजागृती करण्यात आली. आता या योजनेत १.०५ लाख कोटी गुंतविल्याचे स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षी रक्कम ७५५२२ कोटी होती. त्यात यंदा ४० टक्के वाढ झाली आहे.
WATCH : सुकन्या समृद्दी योजनेतून मुलीच्या शिक्षणापासून विवाहापर्यंत मिळेल आधार
गुंतवुणूक कशी होते
- शून्य ते १० या वयोगटातील मुलीचे खाते काढावे
- त्यामध्ये मासिक किंवा वार्षिक रक्कम भरावी
- सलग १५ वर्ष हप्ते भरावेत
- २१ व्या वर्षी खात्यात जमा झालेली रक्कम ७.६ टक्के व्याजाने परत मिळते.
- पालक १८ व्या वर्षीही रक्कम काढू शकतात
- कमीत कमी २५० रुपये प्रती महिना या प्रमाणे खाते उघडता येते
- वर्षाला तुम्ही जास्तीत जास्त १.५ लाख गुंतवू शकता
- ही रक्कम ८० सी अंतर्गत आयकर मुक्त आहे
- या रक्कमेतून तुम्ही मुलीला उच्च शिक्षण देऊ शकता
Big response to Sukanya Samrudhi Yojana; 1.05 lakh crore investment till end of May
महत्त्वाच्या बातम्या
- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीचे पुन्हा समन्स, मुलगा ऋषीकेशलाही हजर राहण्यास सांगितले
- ओवेसींचे आव्हान योगी आदित्यनाथ यांनी स्वीकारले, म्हणाले त्यांना विशेष समाजाचे समर्थन असले तरी आम्ही मुल्यांवर निवडणुका लढवू
- पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तामिळनाडूतल्या ४ आमदारांना चर्चेला वेळ दिला यातला राजकीय संदेश काय…??
- राफेलच्या व्यवहाराची फ्रान्समध्ये न्यायालयीन चौकशी; राहुल गांधींनी फक्त ३ शब्दांचे ट्विट केले, चोर की दाढी…