• Download App
    योगी सरकारची उत्तर प्रदेशातील तरुणांना अनोखी भेट, 68 लाख तरुणांना डिसेंबरपासून मिळणार टॅब्लेट आणि स्मार्टफोन। Big News CM Yogi Govt To Provide Tablets And Smartphones To 68 youth in UP From December

    योगी सरकारची उत्तर प्रदेशातील तरुणांना अनोखी भेट, 68 लाख तरुणांना डिसेंबरपासून मिळणार टॅब्लेट आणि स्मार्टफोन

    डिसेंबरपासून उत्तर प्रदेश राज्यातील 68 लाख तरुणांना टॅबलेट किंवा स्मार्टफोन मिळण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींचा डेटा फीड करण्यासाठी लवकरच एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. टॅब्लेट आणि स्मार्टफोनची खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाईल. त्याचा पुरवठा नोव्हेंबरपासून सुरू होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे. Big News CM Yogi Govt To Provide Tablets And Smartphones To 68 youth in UP From December


    वृत्तसंस्था

    लखनऊ : डिसेंबरपासून उत्तर प्रदेश राज्यातील 68 लाख तरुणांना टॅबलेट किंवा स्मार्टफोन मिळण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी पात्र विद्यार्थी आणि प्रशिक्षणार्थींचा डेटा फीड करण्यासाठी लवकरच एक पोर्टल सुरू करण्यात येणार आहे. टॅब्लेट आणि स्मार्टफोनची खरेदी GeM पोर्टलद्वारे केली जाईल. त्याचा पुरवठा नोव्हेंबरपासून सुरू होईल, असा राज्य सरकारचा दावा आहे.

    औद्योगिक विकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांचा डेटा फीड करण्याची जबाबदारी संबंधित महाविद्यालय, विद्यापीठ किंवा शैक्षणिक संस्थांची असेल. डेटा फीडिंगनंतर, योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवर टॅबलेट किंवा स्मार्टफोन उपलब्ध आहे की नाही याची माहिती दिली जाईल.



    ते म्हणाले की, टॅब्लेट किंवा स्मार्ट फोनच्या खरेदीसाठी निविदेतील अटी आणि शर्तींना मंत्रिमंडळाची मान्यता मिळेल. मंजुरी मिळाल्यानंतर सात दिवसांत निविदा काढली जाईल. त्याचे वितरण डिसेंबरपासून सुरू होईल. ते म्हणाले की, जिल्हास्तरीय समिती त्याच्या वितरणासाठी रोडमॅप तयार करेल.

    90 टक्के तरुणांना मिळणार टॅब्लेट

    एसीएस अरविंद कुमार यांनी सांगितले की, 80 ते 90 टक्के विद्यार्थ्यांना टॅबलेट दिले जातील. केवळ 10 ते 20 टक्के विद्यार्थ्यांना स्मार्टफोन मिळतील.

    Big News CM Yogi Govt To Provide Tablets And Smartphones To 68 youth in UP From December

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपतीपदी; मोदी सरकार पाडण्यासाठी राहुल बाबा उंगल्या करायला गेले; पण INDI आघाडीच्या खासदारांचीच एकजूट नाही टिकवू शकले!!

    Vice Presidential election : लाल संविधान, उभी दांडी, मलेशियातून केली खेळी; तरी विरोधकांची मते फुटली!!

    Elite Force : भारत तयार करणार अमेरिका – इस्रायलप्रमाणे विशेष एलिट फोर्स; शत्रूच्या घरात घुसून करणार कारवाई