• Download App
    BIG NEWS: उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूलवर हिमस्खलन : नौदलाचे 10 जवान बेपत्ता ; 5 जण मुंबईचे! । BIG NEWS: Avalanche on Mount Trishul in Uttarakhand: 10 naval personnel missing; 5 from Mumbai!

    BIG NEWS: उत्तराखंडच्या माऊंट त्रिशूलवर हिमस्खलन : नौदलाचे 10 जवान बेपत्ता ; 5 जण मुंबईचे!

    मुंबईवरुन 3 सप्टेंबर रोजी गिर्यारोहण मोहिमेसाठी एकूण 20 सदस्यांची टीम रवाना झाली होती.


    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : उत्तराखंडमध्ये हिमस्खलनाची (avalanche in uttarakhand) मोठी घटना समोर आली आहे. उत्तराखंडच्या (uttarakhand) माऊंट त्रिशूलवर हिमस्खलन (avalanche in maunt trishul) झाले आहे. या दुर्घटनेमध्ये माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी (mountaineering) गेलेले भारतीय नौदलाचे 10 जवान बेपत्ता झाले आहेत. यामधील 5 जण मुंबईचे (Mumbai) असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या त्यांचा शोध घेण्याचे काम सुरु आहे. BIG NEWS: Avalanche on Mount Trishul in Uttarakhand: 10 naval personnel missing; 5 from Mumbai!

    हिमस्खलनात बेपत्ता झालेल्या 10 जणांचा (10 jawans missing) शोध घेण्याचे काम वेगाने सुरु आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईवरुन 3 सप्टेंबर रोजी गिर्यारोहण मोहिमेसाठी एकूण 20 सदस्यांची टीम रवाना झाली होती. ही 20 जणांची टीम 7,120 मीटर उंच माऊंट त्रिशूलवर गिर्यारोहणासाठी गेली होती. सकाळी 10 जवान मोहिमेच्या शेवटच्या टप्प्यासाठी पुढे गेले. पण प्रवासादरम्यान हिमस्खलनाची घटना घडली आणि ते बेपत्ता झाले.



    कुमाऊंमधील बागेश्वर जिल्ह्यातील चमोली जिल्ह्याच्या (Chamoli District) सीमेवर माऊंट त्रिशूल आहे. या ठिकाणी नेहमी हिमस्खलनाच्या घटना घडत असतात. नेहरू इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगचे (Nehru Institute of Mountaineering) प्राचार्य अमित बिष्ट म्हणाले की, ‘हिमस्खलनाची ही घटना शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास घडली आहे. यामध्ये 10 जवान बेपत्ता झाले आहेत.’ दरम्यान, हेलिकॉप्टर (Helicopters), लष्कर (Army), हवाई दल (Air Force), राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि ग्राउंड रेस्क्यू टीम (Ground Rescue Team) युद्धपातळीवर शोधकार्य करत आहे.

    BIG NEWS : Avalanche on Mount Trishul in Uttarakhand: 10 naval personnel missing; 5 from Mumbai!

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Nashik Kumbh Mela : नाशिक कुंभमेळ्यासाठी ई-बस सेवा अन् रस्ते प्रकल्पाला गती

    Delhi court : दिल्ली कोर्टात आरोपी-वकिलांची न्यायाधीशांना धमकी; म्हणाले- बाहेर भेटा, बघू तुम्ही जिवंत घरी कसे पोहोचता!

    ISRO : इस्रोला दुसऱ्यांदा डॉकिंगमध्ये यश, दोन उपग्रह जोडले; जानेवारीत प्रथमच स्पेस डॉकिंग केले होते