• Download App
    मध्यप्रदेशात महिलांना मोठी भेट, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण, अधिसूचना जारी Big gift to women in Madhya Pradesh 35 percent reservation in government jobs notification issued

    मध्यप्रदेशात महिलांना मोठी भेट, सरकारी नोकऱ्यांमध्ये ३५ टक्के आरक्षण, अधिसूचना जारी

    शिवराज सिंह सरकारने महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे.

    विशेष प्रतिनिधी

    भोपाळ : मध्य प्रदेशात विधानसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, सरकारने राज्यातील महिलांना मोठी भेट दिली आहे. आता मध्य प्रदेशात महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये 35 टक्के आरक्षण दिले जाणार आहे.यासाठी शिवराज सिंह सरकारने अधिसूचना जारी केली आहे. Big gift to women in Madhya Pradesh 35 percent reservation in government jobs notification issued

    अधिसूचनेनुसार, मध्य प्रदेश नागरी सेवा (महिलांच्या नियुक्तीसाठी विशेष तरतुदी) नियम, १९९७मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. यामध्ये वनविभाग वगळता सर्व भरतीमध्ये महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचे म्हटले आहे.

    मध्य प्रदेशात आतापर्यंत महिलांना सरकारी नोकऱ्यांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळत होते. या आरक्षणाची तरतूद नियम १९९५मध्ये करण्यात आली होती. शिक्षक भरतीमध्ये महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याची तरतूद आहे. तर पोलिस विभागात हे प्रमाण ३० टक्के आहे. तर उर्वरित सरकारी पदांमध्ये महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण आहे.

    मातेरे – पोतेरे – वाटोळे; राऊत – आव्हाडांच्या तोंडून शब्दांचे भेंडोळे!!

    शिवराज सिंह सरकारने महिलांना स्वावलंबी आणि सशक्त बनवण्याच्या दिशेने टाकलेले सकारात्मक पाऊल असल्याचे म्हटले आहे. सरकारी अधिसूचनेनुसार, “कोणत्याही सेवा नियमात काहीही असले तरी, राज्यांतर्गत सेवेतील सर्व पदांपैकी ३५ टक्के पदे (वन विभाग वगळता) थेट भरतीच्या टप्प्यावर महिलांच्या बाजूने महिलांसाठी राखीव असतील. या आरक्षणामुळे क्षैतिज  विभागवार असेल.

    Big gift to women in Madhya Pradesh 35 percent reservation in government jobs notification issued

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!