- तीन जणांची प्रकृती चिंताजनक
विशेष प्रतिनिधी
नागपूर : येथील एका सोलर एक्सप्लॉसिव्ह कंपनीत मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटात किमान 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नागपूरच्या बाजारगाव गावातील सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत स्फोट झाला आहे.Big explosion at Solar Explosive Company in Nagpur nine people died
सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग करत असताना हा स्फोट झाला. स्फोटानंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांचा आकडा वाढू शकतो. स्फोटातील तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, नागपूर ग्रामीणचे एसपी हर्ष पोद्दार यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले की, ‘नागपूरच्या बाजारगाव गावात सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनीत झालेल्या स्फोटामुळे नऊ जणांचा मृत्यू झाला. सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंग दरम्यान हा स्फोट झाला.
तर अपर पोलीस अधीक्षक डॉ. या घटनेबाबत संदीप पखाले म्हणाले की, या कारखान्यात मोठ्या प्रमाणात दारूगोळा व रसायने असल्याने जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता आहे. या स्फोटाची नेमकी तीव्रता अद्याप समोर आलेली नाही. मृतांमध्ये ६ पुरुष आणि ३ महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर अमरावती रोडवरील बाजार गावात ही कंपनी असून प्राथमिक माहितीनुसार आज सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.
Big explosion at Solar Explosive Company in Nagpur nine people died
महत्वाच्या बातम्या
- छाप्यांमध्ये 351 कोटी सापडल्यानंतर 10 दिवसांनी धीरज साहूनी तोंड उघडले; “हात” वर करून मोकळे झाले, पण…
- अयोध्येत 22 जानेवारीच्या राम लल्ला प्रतिष्ठापना सोहळ्यानंतर भाजपचे मतदारांसाठी अयोध्या यात्रांचे भव्य आयोजन!!
- विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टाची मुदतवाढ; शिवसेना आमदारांच्या पात्र पात्रतेचा निर्णय 10 जानेवारीला!!
- Good news! आता ‘या’ देशात जाण्यासाठी भारतीयांना गरजेचा नसेल ‘Visa’