• Download App
    छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल समर्थकांची प्रतिस्पर्धी गटाच्या काँग्रेस नेत्याला भर स्टेजवर धक्काबुक्की; बघेलांनी खुर्ची खाली करण्याची मागणी|Bhupesh Baghel's supporters pushed the Congress leader of the rival group on the stage; Baghela demanded to lower the chair

    छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्री भूपेश बघेल समर्थकांची प्रतिस्पर्धी गटाच्या काँग्रेस नेत्याला भर स्टेजवर धक्काबुक्की; बघेलांनी खुर्ची खाली करण्याची मागणी

    वृत्तसंस्था

    जशपूर – छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने उत्तर प्रदेशासारख्या सर्वांत महत्त्वाच्या राज्याची प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. पण त्यांचे गृहराज्य छत्तीसगडमध्येच त्यांना गटबाजी संपविता येईनाशी झाली आहे.Bhupesh Baghel’s supporters pushed the Congress leader of the rival group on the stage; Baghela demanded to lower the chair

    जशपूरमध्ये काँग्रेसच्या कार्यक्रमात पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पवन आगरवाल हे जेव्हा स्टेजवरून भाषण करीत होते, तेव्हा काँग्रेसच्याच भूपेश बघेल यांच्या गटाच्या नेत्यांनी त्यांना धक्काबुक्की करून त्यांचे भाषण बंद पाडले. सभागृहात बघेल आणि त्यांच्याच मंत्रिमंडळातील मंत्री टी. एस. सिंगदेव यांच्या गटांमध्ये मारामारी झाली. या मारामारीचा विडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.



    यानंतर पत्रकारांशी बोलताना पवन आगरवाल चांगलेच संतापलेले दिसले. त्यांनी उघडपणे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या विरोधात वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, टी. एस. सिंगदेव गेल्या अडीच वर्षांपासून मुख्यमंत्री होण्याची वाट पाहात आहेत. ज्येष्ठतेनुसार तो मान त्यांचा आहे.

    भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्री पदाची खुर्ची ताबडतोब खाली करावी, अशी मागणी देखील पवन आगरवाल यांनी केली. काँग्रेस सत्तेवर नव्हती तेव्हा बघेल आणि सिंगदेव यांनी एकत्र काम केले होते, याकडेही आगरवाल यांनी लक्ष वेधले.

    भूपेश बघेल यांना काँग्रेस हायकमांडने उत्तर प्रदेश निवडणूक प्रभारी पदाची जबाबदारी देऊन छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदावरून गच्छंतीची तयारीच केल्याचे मानले जात आहे. पण त्यांनी दिवाळीपर्यंत मुदत मागितल्याचे समजते आहे. मात्र, त्या आधीच भर सभेत छत्तीसगड काँग्रेसमधील दुफळी समोर आली आहे.

    Bhupesh Baghel’s supporters pushed the Congress leader of the rival group on the stage; Baghela demanded to lower the chair

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amritpal : अमृतपालवरील NSA वर्षभरासाठी वाढवला; २३ एप्रिलपासून लागू होणार, हायकोर्टात अपिलाची तयारी

    Karnataka’s Janave : कर्नाटकातील जानवे वाद- महाविद्यालयाचे प्राचार्य आणि कर्मचारी निलंबित; जानव्यामुळे विद्यार्थ्याला सीईटीच्या पेपरला बसण्यापासून रोखले

    Rahul Gandhi राहुल गांधींकडून सावरकरांचा पुन्हा अपमान, कथित माफीनाम्यावरून नवे दावे!!