कुठेही आपत्ती आल्यास अवघ्या आठ मिनिटांत हे रुग्णालय तयार होऊन रुग्णांवर उपचार सुरू करता येणार .
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारत दिवसेंदिवस प्रगतीची नवी शिखरे पादक्रांत करत आहे. नुकतीच चांद्रयान ३ मोहीम यशस्वी करून दाखवून भारताने जगात आपलं वेगळंपण सिद्ध केलं आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहचणार भारत जगातील पहिला देश ठरला आहे. त्याचप्रमाणे भारताने आणखी एक अशी कामगिरी केली आहे, ज्यामुळे पुन्हा एकदा अशी कामगिरी करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. भारताने जगातील पहिल्या पोर्टेबल हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. BHISHM Project Worlds first portable hospital made by India can be airlifted too
या पोर्टेबल हॉस्पिटलचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये ऑपरेशन थिएटर, मिनी-आयसीयू, व्हेंटिलेटर, रक्त तपासणी उपकरणे, एक्स-रे मशीन, स्वयंपाक केंद्र, अन्न, पाणी, निवारा, वीज जनरेटर आणि बरेच काही आहे. एवढच नाही तर हे हॉस्पिटल चक्क एअरलिफ्टही करता येते आणि ते 72 क्यूब्समध्ये पॅकही करता येते. ज्यामध्ये आपत्तीमधून बचावलेल्या १०० जणांवर ४८ तासांपर्यंत तातडीचे उपचार करता येतात.
भारतीय शास्त्रज्ञांनी ‘BHISHM'(Bharat Health Initiative for Sahyog Hita and Maitri) अंतर्गत जगातील पहिले पूर्णपणे स्वदेशी बनावटीचे पोर्टेबल आपत्ती रुग्णालय तयार केले आहे. यामुळे कुठेही आपत्ती आल्यास अवघ्या आठ मिनिटांत हे रुग्णालय तयार होऊन रुग्णांवर उपचार सुरू करता येणार आहेत. त्यातील सर्व सामग्री 720 किलोग्रॅमच्या 36 बॉक्समध्ये येते, जे हेलिकॉप्टरमधून फेकले गेले तरीही तुटत नाहीत किंवा पाण्याने प्रभावित होत नाहीत.
तीन लोखंडी फ्रेम्स आहेत, प्रत्येक फ्रेममध्ये 12 लहान बॉक्स आहेत. म्हणजे सर्व वस्तू असलेले एकूण 36 बॉक्स आहेत. तीनही फ्रेम्सच्या मध्यभागी एक छोटा जनरेटर बसवला आहे.फ्रेमच्या वर दोन स्ट्रेचर देखील आहेत जे ऑपरेशन थिएटरमध्ये बेड म्हणून काम करू शकतात. प्रत्येक बॉक्समध्ये भारतीय बनावटीची औषधे, उपकरणे आणि खाद्यपदार्थ आहेत.
पेन अँटीबायोटिक किट, शॉक किट, चेस्ट इंज्युरी किट, एअरवे किट आणि ब्लीडिंग किटही उपलब्ध आहे.
गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भीष्म प्रकल्पाची घोषणा केली होती, त्यानंतर संरक्षण मंत्रालयाने भीष्म टास्क फोर्सची स्थापना केली होती. त्याचे प्रमुख एअर व्हाइस मार्शल तन्मय राय म्हणाले, हे एक आपत्ती रुग्णालय आहे, ज्यामध्ये एक्स-रे आणि रक्ताचे नमुने आणि व्हेंटिलेटर तपासण्यासाठी ऑपरेशन थिएटरपासून प्रयोगशाळेपर्यंत सर्व गोष्टींचा समावेश आहे. त्याला आरोग्य मैत्री असे नाव देण्यात आले असून बॉक्सला आरोग्य मैत्री क्यूब असे नाव देण्यात आले आहे. ते म्हणाले की भारताचे आपत्ती रुग्णालय हे आतापर्यंतचे सर्वात अद्वितीय मॉडेल आहे, जे इतर देशांना निर्यात करण्यासाठी बनवले गेले आहे आणि जे पूर्णपणे सौर ऊर्जा आणि बॅटरीवर चालते. आतापर्यंतच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की कोणत्याही आपत्तीमध्ये सुमारे दोन टक्के लोकांना त्वरित गंभीर वैद्यकीय सेवेची आवश्यकता असते. तसेच, हॉस्पिटल तयार करण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपये खर्च येतो. भारत हे रुग्णालय तीन देशांना मोफत देणार आहे. सरकार लवकरच त्याची घोषणा करेल.
BHISHM Project Worlds first portable hospital made by India can be airlifted too
महत्वाच्या बातम्या
- जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीमारावर अजित पवारांची प्रतिक्रिया, म्हणाले…
- इथेनॉल इफेक्ट : तेल आयातीतून 53894 कोटी रुपये वाचले; शेतकऱ्यांना 40600 कोटी रुपयांचे जादा उत्पन्न मिळाले!!
- आधी पोलिसांवर दगडफेक, 12 पोलीस जखमी, त्यानंतर जालन्यात लाठीमार; फडणवीसांचा स्पष्ट खुलासा
- Aditya-L1 : सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘ISRO’ आज लॉन्च करणार ‘आदित्य एल 1’; जाणून घ्या वेळ