• Download App
    भगवंत मान यांचा भगतसिंग यांच्या गावात बुधवारी शपथविधी; खटखड कला येथे जोरदार तयारी ।Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Bhagat Singh

    भगवंत मान यांचा भगतसिंग यांच्या गावात बुधवारी शपथविधी; खटखड कला येथे जोरदार तयारी

    वृत्तसंस्था

    चंडीगढ : आम आदमी पक्षाच्या (आप) विधिमंडळ पक्षाचे नेते भगवंत मान मुख्यमंत्रिपदाची व ६ आमदार मंत्रिपदाची बुधवारी शपथ घेणार आहेत.
    हुतात्मा भगतसिंग यांचे गाव खटखड कला येथे १६ मार्च रोजी होणार असलेल्या शपथविधी समारंभात आमदार अमन अरोडा, हरपाल सिंग चीमा, कुलतार सिंग संधवा, हरजोत बैंस, बलजिंद्र कौर आणि कुंवर विजय प्रताप सिंग हे मान यांच्या समवेत शपथ घेणार आहेत. राज्यपाल बनवारीलाल पुरोहित त्यांना ही शपथ देतील. Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Bhagat Singh



    मुख्यमंत्र्यांसह १८ आमदार मंत्री बनू शकतात. मंत्रिमंडळाचा विस्तारात ११ आमदारांना मंत्रीपद दिले जाईल. आपने पंजाबमध्ये ११७ सदस्यांच्या विधानसभेत ९२ जागा जिंकल्या. २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीत आपने २० जागा जिंकल्या होत्या. परंतु, ५ वर्षे पूर्ण होता होता ५ आमदारांनी पक्ष सोडला.  मुख्यमंत्री आणि १७ मंत्र्यांनी एकाच वेळी शपथ घ्यावी, असे पक्षश्रेष्ठींचे मत नाही. यामुळे मंत्रिमंडळाच्या विस्ताराची संधी मिळते. याबाबत बलवंत मान आधीच म्हणाले आहेत की, फक्त १७ आमदार मंत्री बनू शकतात. त्यामुळे मंत्री न बनणाऱ्या आमदारांनी नाराज होऊ नये.

    Bhagwant Mann sworn in on Wednesday; Intensive preparations in the village of Bhagat Singh

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य