• Download App
    पंजाब मध्ये भगवंत मान आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार । Bhagwant Mann is the Aam Aadmi Party's Chief Ministerial candidate in Punjab

    पंजाब मध्ये भगवंत मान आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

    वृत्तसंस्था

    चंडीगड : पंजाब मध्ये खासदार भगवंत मान यांच आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार म्हणून नाव आज जाहीर करण्यात आले. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी भगवंत मान यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली. या मुद्द्यावरून आम आदमी पार्टीमध्ये बरेच राजकारण रंगल्याची चर्चा होती परंतु अखेर भगवंत मान यांच्या उमेदवारीवर पार्टीने शिक्कामोर्तब केले आहे. Bhagwant Mann is the Aam Aadmi Party’s Chief Ministerial candidate in Punjab

    पंजाब मध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करणारा आम आदमी पार्टी हा पहिला पक्ष ठरला आहे. काँग्रेस जरी सध्या मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवत असली तरी त्यांचे नाव मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून काँग्रेसने जाहीर केलेले नाही. तसेच अकाली दलातर्फे सुखबीर सिंग बादल हेच मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार असल्याने त्यांची स्वतंत्र घोषणा करण्यात आलेली नाही. पंजाब लोक काँग्रेस भाजप आणि संयुक्त अकाली दल या तीन पक्षांची आघाडी निवडणूक लढवत आहे. या आघाडीतून माजी मुख्यमंत्री आणि पंजाब लोक काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदरसिंग हे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असणार आहेत. त्यामुळे भगवंत मान यांची मुख्यमंत्री पदाची उमेदवारी हे आम आदमी पार्टीचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.



    भगवंत मान हे सध्या संगरूर लोकसभा मतदारसंघातले आम आदमी पार्टीचे खासदार असून पंजाब मध्ये आम आदमी पार्टीचा राजकीय पाया मजबूत करण्यासाठी त्यांचे योगदान मोठे राहिले आहे. आम आदमी पार्टीने जनतेला आवाहन करून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार कोण असावा हे सांगण्याचे सांगण्याची विनंती केली होती. त्यानुसार जनतेचा कौल आम आदमी पार्टीसाठी तरी भगवंत मान यांच्या बाजूने गेला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी भगवंत माने यांची मुख्यमंत्री पदाची उमेदवारी जाहीर केली आहे.

    Bhagwant Mann is the Aam Aadmi Party’s Chief Ministerial candidate in Punjab

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!

    Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!

    विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट