नाशिक : दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच ऑपरेशन सिंदूरचे सगळ्यात मोठे यश ठरले!! भारतीय सैन्य दलांनी precision and professional attack करून पाकिस्तानी दहशतवाद्यांचे आणि त्यांच्या लष्करी पोशिंद्यांचे असे काही कंबरडे मोडले, की आता इथून पुढे पाकिस्तानात दहशतवादी एका ठिकाणी ट्रेनिंग घेतील आणि दुसऱ्या कुठल्या ठिकाणी जाऊन सुरक्षित राहतील, अशी शक्यताच उरलेली नाही. Operation Sindoor
कारण भारतीय सैन्य दले पाकिस्तानात कुठेही घुसून एकतर त्यांचे ट्रेनिंग कॅम्पस तरी उडवतील, नाहीतर त्यांची राहण्याची ठिकाणे तरी उद्ध्वस्त करून टाकतील. यासाठी भारतीय सैन्य दले इस्रोच्या उपग्रहांपासून ते सर्व अत्याधुनिक विमाने आणि मिसाईल्स पर्यंत सर्व शस्त्रांचा बिनधास्त वापर करतील, हा “मेसेज” पाकिस्तानी दहशतवादी आणि त्यांच्या आकांना मिळाला आहे.
आत्तापर्यंत पाकिस्तानातल्या दहशतवाद्यांचे आका पाकिस्तानी गुप्तहेर संघटना ISI च्या कडेकोट बंदोबस्तात चार – चार मजली बंगल्यांमध्ये सुरक्षित राहात होते. भारतात दहशतवादी कारवाया करून पाकिस्तानात जाऊन मजा मारत होते. त्यांना कुणी हात लावू शकणार नाही, असा पाकिस्तानने त्यांचा समज करून दिला होता. पण तो समज भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर मधून खोटा ठरविला.
भारताने सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकच्या वेळी पाकिस्तानात नियंत्रण रेषेजवळ किंवा आंतरराष्ट्रीय सीमेजवळ कारवाई करून तिथले दहशतवादी कॅम्पस नष्ट केले होते. पण यावेळी मात्र भारतीय सैन्य दलांनी पाकिस्तानच्या हद्दीत खोलवर घुसून ISI गुप्तहेर संघटना चालवत असलेले मुरिदके आणि बहावलपूर इथले दहशतवादी कॅम्प आणि दहशतवाद्यांची राहण्याची ठिकाणे उद्ध्वस्त केली. पाकिस्तानातले 7 हवाई तळ नष्ट केले. त्यामुळे भारताची अचूक आणि संहारक मारक क्षमता पाकिस्तानच्या लक्षात आली.
पण त्या पलीकडे जाऊन भारतीय सैन्य दलाने रा रावळपिंडीपर्यंत वेगळी धडक मारली. भारतीय हवाई दलाने precision and professional attack करून इस्लामाबाद मधला चकलाला आणि सरगोधा इथले हवाई तळ नष्ट केले. त्यामुळे पाकिस्तानातले दहशतवादी आणि त्यांचे आका पाकिस्तान मधल्या सर्वांत सुरक्षित आणि कडेकोट बंदोबस्ताच्या मानल्या गेलेल्या ठिकाणांवर देखील सुरक्षित राहणार नाहीत, हे सिद्ध झाले. दहशतवादी आणि त्यांचे आका पाकिस्तानात ज्या “सुरक्षित” ठिकाणी जातील, तिथे भारतीय सैन्य दले अत्याधुनिक हत्यारांनी पोहोचून त्यांना ठोकतील, हा सगळ्यात कठोर आणि अचूक “मेसेज” ऑपरेशन सिंदूरने दिला. गोली का जबाब गोले से मिलेगा हे मोदी म्हणाले, ते प्रत्ययाला आले.
better know that violations will have consequences. Operation Sindoor is still on
महत्वाच्या बातम्या
- भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा
- ceasefire पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्याची परराष्ट्र मंत्रालयानेही केली पुष्टी
- कसलं ceasefire??, अवघ्या 4 तासांत पाकिस्तान कडून विश्वासघात, शस्त्रसंधीचे उल्लंघन, जम्मूतल्या गोळीबारात BSF जवान शहीद!!