• Download App
    रामपुरहाट हिंसाचारावरून बंगाल विधानसभेत तृणमूल आमदारांची दादागिरी, तुंबळ हाणामारी!!Bengal Jihadi Terrorism in vidhan bhavan fight tmc mla

    Bengal Jihadi Terrorism : रामपुरहाट हिंसाचारावरून बंगाल विधानसभेत तृणमूल आमदारांची दादागिरी, तुंबळ हाणामारी!!

    वृत्तसंस्था

    कोलकाता : पश्चिम बंगालच्या बीरभूममधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून सोमवारी विधानसभेत जोरदार रणकंदन झाले. यावेळी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसच्या आमदारांनी दादागिरी केल्यानंतर भाजप आणि तृणमूल काँग्रेसच्या आमदार सदस्यांमध्ये तुंबळ हाणामारी होऊन कपडे फाडण्यापर्यंत मजल गेली. या घटनेनंतर भाजपच्या 5 आमदारांना निलंबित करण्यात आले आहे. Bengal Jihadi Terrorism in vidhan bhavan fight tmc mla

    बीरभूम हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी

    पश्चिम बंगाल विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी बीरभूम हिंसाचाराच्या मुद्द्यावर चर्चेची मागणी केल्यावर तृणमूल काँग्रेसचे आमदार आक्रमक झाले यानंतर भाजप आणि तृणमूल आमदारांमध्ये भांडण झाले. मारामाऱ्या झाल्या इतकेच नव्हे तर आमदारांनी भांडणामध्ये एकमेकांचे कपडेही फाडले. गदारोळानंतर भाजप आमदारांनी सभात्याग केला. या हाणामारीत तृणमूल आमदार आमदार असित मजुमदार यांच्या नाकाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे. मजुमदार यांना एसएसकेएममध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे. या घटनेनंतर भाजपच्या पाच आमदारांना निलंबित करण्यात आले असून यामध्ये शुभेंदू अधिकारी, मनोज तिग्गा, शंकर घोष, दीपक बर्मन आणि नरहरी महतो यांचा समावेश आहे. या दरम्यान भाजप आमदार मनोज तिग्गा यांना मारहाण करण्यात आली.

    धक्काबुक्की करत फाडले त्यांचे कपडे 

    बीरभूम हिंसाचार प्रकरणी भाजपने सभागृहात चर्चेची मागणी केली आणि त्यानंतर विरोध सुरू झाला. यानंतर सभागृहातील परिस्थिती बिघडली आणि दोन्ही गटांमध्ये हाणामारी सुरू झाली. यानंतर भाजप आमदारांनीही विधानसभेबाहेर निदर्शने केली. सभागृहात निषेधादरम्यान सुरक्षा रक्षकांनी आपल्यावर हल्ला केला आणि ढकलले, असा आरोप भाजप आमदारांनी केला आहे. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांनी सांगितले की, भाजप आमदारांना धक्काबुक्की करण्यात आली आणि त्यांचे कपडे फाडण्यात आले.

    Bengal Jihadi Terrorism in vidhan bhavan fight tmc mla

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Indo Pak ceasefire : भारताने धोरणात्मक निर्णय बदलल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात यांच्यात शस्त्रसंधी, डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा

    Shri Siddhivinayak Temple : श्री सिद्धिविनायक मंदिरात आता नारळ, हार अन् प्रसाद बंदी

    Marco Rubio and S Jaishankar : अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी एस जयशंकर यांच्याशी केली चर्चा