बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीची मतमोजणी सुरू . सकाळी सात वाजता मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी होत आहे.
खासदार सुरेश अंगडी यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. १८ लाख १३ हजार ५६७ पैकी १० लाख ८ हजार ६०१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Shiv Sena
विशेष प्रतिनिधी
बेळगाव : बेळगाव लोकसभा पोट निवडणुकीच्या मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. बेळगावच्या आर पी डी कॉलेजमध्ये मतमोजणी सुरू आहे. तिथेच मतदान यंत्रे कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आलेली होती. भाजपच्या मंगला अंगडी, काँग्रेसचे सतीश जारकीहोळी आणि समितीचे शुभम शेळके हे निवडणुकीतील प्रमुख उमेदवार आहेत.
केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर लागलेल्या या पोटनिवडणुकीत भाजपने त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली आहे. तर महाराष्ट्र एकीकरण समितीकडून अवघ्या 26 वर्षांचे शुभम शेळके मैदानात उतरले आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी शिवसेना ताकदीनिशी उतरली आहे, तर भाजपच्या प्रचारासाठीही दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरली.
त्यामुळे या निवडणुकीला शिवसेना विरुद्ध भाजप असेही पाहिले जाते. याशिवाय काँग्रेसच्या सतीश जारकीहोळी यांच्यासह 10 जण निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. बेळगावसह कर्नाटकातील 15 पोटनिवडणुकांचे निकाल जाहीर होणार आहेत. या लढतीत कोण बाजी मारणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे
बेळगाव पोटनिवडणुकांचे पहिले कल हाती, पोस्टल मतमोजणीत काँग्रेसचे सतीश जारकीहोळी पुढे
काँग्रेस – सतीश जारकीहोळी : 7584
भाजप – मंगला अंगडी : 4693
महाराष्ट्र एकीकरण समिती – शुभम शेळके : 337
Belgaum Lok sabha bypoll result BJP vs Shiv Sena
महत्त्वाच्या बातम्या
- Pandharpur Election Result 2021 Live : पंढरपूरमध्ये पोस्टल गणना सुरू, अवताडे Vs भालकेंमध्ये कांटे की टक्कर! पाहा अपडेट्स
- Kerala Assembly Election Result Live : 140 जागांसाठी मतमोजणीला सुरुवात, एलडीएफ की यूडीएफ कोण मारणार बाजी?
- Assam Election Result LIVE : आसाममध्ये 126 जागांच्या मतमोजणीला सुरुवात, भाजप राखणार का सत्ता, आज होणार स्पष्ट!
- West Bengal Assembly Election 2021 Results Live : बंगालचा कौल येण्यापूर्वी समजून घ्या बंगालचा ताजा ताजा राजकीय इतिहास…
- West Bengal Assembly Election 2021 Result Live : नंदीग्रामकडे अवघ्या देशाचे लक्ष.. ‘गड’ आणि ‘सिंह’ दोघेही शाबूत राहतील? शुभेंदू ‘जायंट किलर’ ठरतील?