विशेष प्रतिनिधी
ग्लासगो: भारतातील सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोणी आपल्या पक्षात येण्याचा सल्ला देईल का? अशक्यच गोष्ट. परंतु, इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांनी मोदी हे त्यांच्या देशात सर्वाधिक लोकप्रिय असल्याने आपल्या पक्षात येण्याचा सल्ला दिला आहे.Being the most popular, He advised Prime Minister Narendra Modi to join his party
ग्लासगो येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चा केली. यावेळी इस्रायलचे पंतप्रधान बेनेट यांनी पीएम मोदींचे भरभरून कौतुक केले. आपण इस्रायलमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहात असे म्हणत गंमतीत पंतप्रधान मोदींना त्यांच्या पक्षात येण्याचा प्रस्तावही दिला. यावर पंतप्रधान मोदीही मन मोळेपणाने हसले.
या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी, दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवरही चर्चा केली. तसेच, उच्च-तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन क्षेत्रात सहकार्य वाढविण्यावरही विचारांची देवाणघेवाण केली. बेनेट पंतप्रधान मोदींना म्हणाले, आपण इस्रायलमधील सर्वाधिक लोकप्रिय व्यक्ती आहात. बेनेट यांनी मोदींना त्यांच्या यामिना पक्षात सामील होण्यास सांगितले. यावर दोन्ही नेत्यांनी हसत-हसत हस्तांदोलन केले. यावेळी बेनेट म्हणाले, या आणि माज्या पक्षात सामील व्हा.
पंतप्रधान मोदींनी बेनेट यांच्याशी झालेल्या भेटीची आठवण करून देत सांगितले, की भारतातील लोक इस्रायलसोबतच्या मैत्रीला खूप महत्त्व देतात. इस्रायलसोबतची मैत्री आणखी घट्ट करत, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि नफ्ताली बेनेट यांची ग्लासगो येथे यशस्वी बैठक झाली.
दोन्ही नेत्यांनी आपल्या नागरिकांच्या हितासाठी सहकार्याच्या विविध उपायांना बळकट करण्यावर चर्चा केलीमोदी आणि बेनेट यांची ही भेट, परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांच्या गेल्या महिन्यातील इस्रायल भेटीदरम्यान मोदींच्या वतीने इस्रायली पंतप्रधानांना भारतात येण्याचे निमंत्र दिल्यानंतर झाली आहे, असे पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
Being the most popular, He advised Prime Minister Narendra Modi to join his party
महत्त्वाच्या बातम्या
- मंदिराच्या सोन्यावर डोळा ठेवणारे तामीळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलीन यांना न्यायालयाचा दणका, सोने वितळविण्यास केली मनाई
- अफगणिस्थानच्या विजयावर भारताच्या आशा, तरच पोहोचू शकतो उपांत्य फेरीत
- एलपीजी सिलिंडर २६५ रुपयांनी महागला; दिवाळीच्या तोंडावरच गॅसचा उडाला भडका
- राज्य सरकार साडेसात दिवसच टिकणार; केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे खळबळजनक विधान