• Download App
    Mohamed Muizzu भारत दौऱ्यापूर्वी मुइज्जू म्हणाले

    भारत दौऱ्यापूर्वी मुइज्जू म्हणाले- इंडिया आऊट अजेंडा चालवला नाही, कधीच भारताच्या विरोधात नव्हतो

    Mohamed Muizzu

    वृत्तसंस्था

    न्यूयॉर्क : मालदीवचे राष्ट्रपती मोहम्मद मुइज्जू  ( Mohamed Muizzu ) यांनी ‘इंडिया आऊट’ अजेंडा राबविल्याचा इन्कार केला आहे. मी कधीच भारताच्या विरोधात नसल्याचे ते म्हणाले. केवळ भारतीय सैन्याची उपस्थिती ही मालदीवसाठी गंभीर समस्या होती. संयुक्त राष्ट्र महासभेला संबोधित करण्यासाठी मुइज्जू अमेरिकेला गेले आहेत. यादरम्यान ते प्रिन्स्टन विद्यापीठात पोहोचले होते. येथे त्यांनी या गोष्टी सांगितल्या.

    मालदीवचे पंतप्रधान म्हणाले- “आम्ही कधीही कोणत्याही देशाच्या विरोधात नाही. मालदीवच्या लोकांना परदेशी सैनिकांची समस्या होती. लोकांना देशात एकही परदेशी सैनिक नको होता.



    पंतप्रधान मोदींवर टिप्पणी करणाऱ्यांवर कारवाई

    पीएम मुइज्जू म्हणाले की, सोशल मीडियावर भारतीय पंतप्रधानांचा अपमान करणाऱ्या मंत्र्यांवर कारवाई केली आहे. ते म्हणाले- असे कोणी बोलू नये. असा अपमान मी कोणाचाही, मग तो नेता असो वा सामान्य माणूस, सहन करणार नाही. प्रत्येकाचा स्वतःचा आदर आहे.

    या वर्षाच्या सुरुवातीला मालदीव सरकारमधील उपयुवा मंत्री मलशा शरीफ आणि मरियम शिउना यांनी सोशल मीडियावर पंतप्रधानांविरोधात टिप्पणी केली होती. यानंतर भारतात सोशल मीडियावर मालदीवविरोधात संताप व्यक्त होत होता.

    Before India tour, Muijju said – India out agenda was never run, was never against India

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!