Tuesday, 13 May 2025
  • Download App
    मोदींच्या राज्यात तृष्टीकरणाच्या राजकारणाला स्थान नाही, २०१७ पूर्वी अब्बाजान म्हणणारेच सगळे रेशन खात होते, योगी आदित्यनाथ यांनी ठणकावले|Before 2017, everyone who called Abbajan was eating rations, Yogi Adityanath said.me%

    मोदींच्या राज्यात तृष्टीकरणाच्या राजकारणाला स्थान नाही, २०१७ पूर्वी अब्बाजान म्हणणारेच सगळे रेशन खात होते, योगी आदित्यनाथ यांनी ठणकावले

    विशेष प्रतिनिधी

    लखनऊ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राज्यात तृष्टीकरणाला स्थान नाही. २०१७ पूर्वी अब्बाजान म्हणणारेच सगळे रेशन खाऊन टाकत होते. आता गरीबांच्या हक्काचे रेशन कोणीही फस्त करू शकणार नाही. असे करणाºयांना जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिला आहे.Before 2017, everyone who called Abbajan was eating rations, Yogi Adityanath said.

    एका कार्यक्रमात बोलताना योगी आदित्यनाथ म्हणाले, २०१७ पूर्वी प्रत्येकाला रेशन मिळू शकत होते का तर नव्हते. कारण ‘अब्बा जान’ म्हणणारेच सगळे रेशन खाऊन टाक तहोते. पण आता मोदींच्या नेतृत्वाखाली कोणत्याही प्रकारच्या तृष्टीकरणाच्या राजकारणाला स्थान नाही.गरीबांच्या हक्कांचे रेशन आता कोणीही खाऊ शकणार नाही. त्यांना जेलमध्ये जावे लागेल.



    ‘अब्बा जान’ हा शब्द मुख्यत: मुसलमानांद्वारे वडिलांना संबोधित करण्यासाठी वापरला जातो. माजी मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांचे पुत्र अखिलेश यादव यांना लक्ष्य करण्यासाठी हा शब्द वापरला जात आहे. गेल्या महिन्यात, योगी आदित्यनाथ यांनी उत्तर प्रदेश विधानसभेत बोलताना आरोप केला होता की अनेकांनी लसीकरणाला विरोध केला होता. पण त्यांच्या अब्बाजान यांनी लस घेतल्यावर त्यांचा विरोध बंद झाला. अखिलेश यादव यांचे वडील मुलायम सिंग यादव यांच्याकडे त्यांचा निर्देश होता.

    योगी आदित्यनाथ म्हणाले, पंतप्रधान मोदींनी देशाचा राजकीय अजेंडा बदलला आहे. 1947 मध्ये सुरू झालेले तृष्टीकरणाचे राजकारण हे जात, धर्म, प्रदेश आणि भाषा, कुटुंब आणि घराणेशाहीपुरते मर्यादित होते. पंतप्रधानांनी खेड्यांमधील गोरगरीब, शेतकरी, तरुण , महिला आणि मुलांना राजकारणाच्या परीघात आणले आहे. पंतप्रधानांनी मंत्रीमंडळात अभूतपूर्व संख्येने वंचित समाजाच्या सदस्यांची निवड केली आहे.

    Before 2017, everyone who called Abbajan was eating rations, Yogi Adityanath said.

    महत्त्वाच्या बातम्या.

     

    Related posts

    Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांची मुलगी अदितीच्या नावाने बनावट फेसबुक पेजवरून वादग्रस्त पोस्ट

    Rupee gains : डॉलरच्या तुलनेत रुपयाची चांगली वाढ ; जाणून घ्या, कितीवर पोहचला?

    Slap on USA : व्यापाराची लालूच + काश्मीरप्रश्नी “मध्यस्थी” नकोय; महासत्ता अमेरिकेच्या अध्यक्षांची “ऑफर” भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने फेटाळली!!