• Download App
    गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची रामदेव बाबांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी । baba ramdev said declare cow as india national animal

    गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करण्याची रामदेव बाबांची पंतप्रधान मोदी यांच्याकडे मागणी

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : “गायीला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे” अशी मागणी योगगुरू रामदेव बाबा यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. आंध्र प्रदेशमध्ये तिरुमाला तिरुपती देवस्थानच्या वतीने गो महासंमेलन आयोजित केले होते. त्यावेळी रामदेव बाबा यांनी ही मागणी केली. baba ramdev said declare cow as india national animal

    गायीला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करायला हवे. हा प्रस्ताव टीटीडी ट्रस्टनेही पाठल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्याकडे मागणी करतो की त्यांनी गायीला देशाचा राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करावे.



    “पतंजलीने गायींसाठी गोरक्षण मोहीम सुरू केली आहे. गायींच्या सुरक्षेसाठी आणि संरक्षणासाठी आम्ही आघाडीवर आहोत” असेही त्यांनी सांगितलं. यासोबतच आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी यांनी गो महासंमेलनाबद्दल माहिती दिली होती. हिंदू धर्माचा प्रचार केल्याबद्दल त्यांनी टीटीडीचे अध्यक्ष वायव्ही सुब्बा रेड्डी यांचेही कौतुक केले.

    baba ramdev said declare cow as india national animal

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Ahmedabad Sanand Violence : सोशल मीडिया पोस्टवरून अहमदाबादमध्ये दोन गटांमध्ये दगडफेक; 40 जणांना अटक; दोनदा हिंसक संघर्ष

    India-Pakistan War :अमेरिकन थिंक टँकचा दावा- 2026 मध्ये भारत-पाक युद्धाची शक्यता; दोन्ही देशांनी शस्त्रांची खरेदी वाढवली

    World’s 4th Largest Economy : भारत आता जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था, जपानला मागे टाकले; 2030 पर्यंत जर्मनीलाही मागे टाकणार