विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरून बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने व्यथित होऊन त्यांच्या एका कट्टर समर्थकाने आत्महत्य केली आहे. चामराजनगर येथे राहणाºया एका तरुणाने येडियुरप्पा यांनी राजीनामा दिल्याने निराश होऊन आत्महत्या केलीय्. या प्रकरणाचा पोलीस तपास करत आहेत.B. S. Yeddyurappa’s Supporter commits suicide over resignation
या तरुणाच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. येडियुरप्पांनीही या तरुणाच्या मृत्यूवर शोक व्यक्त केला आहे.आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव रवि असं असून तो ३५ वर्षांचा होता. येडियुरप्पा यांनी कन्नडमध्ये ट्विट केलं आहे. मी राजीनामा दिल्याने रविने आत्महत्या केली ही बातमी माझ्यासाठी फार दु:खद आहे.
राजकारणामध्ये चढ उतार येत असतात. त्यामुळे एखाद्याने आपले प्राण द्यावे हे कोणत्याप्रकारे स्वीकारता येणार नाही. ज्या दु:खामधून त्याचं कुटुंब जात आहे त्याची कोणत्याही प्रकारे भरपाई करता येणार नाही.
येडियुरप्पा यांनी सोमवारी राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे राजीनामा सोपवल्यानंतर आपण स्वेच्छेने हे पद सोडल्याचे सांगितले.
दोन महिन्यांपूर्वीच मी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला होता. दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होणे ही राजीनाम्याची योग्य वेळ असल्याचे मला वाटले. त्यानुसार मी राज्यपालांकडे माझा राजीनामा सोपवला असून त्यांनी तो स्वीकारला आहे,
असे येडियुरप्पा यांनी राजभवनातून बाहेर पडल्यानंतर पत्रकारांना सांगितले. पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाचा आपल्यावर कुठलाही दबाव नव्हता, तर इतरांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी देण्यासाठी आपण स्वत:हूनच हे पद सोडले, असे ते म्हणाले.
आपण राजकारणात कायम राहणार असून, भाजपला पुन्हा सत्तेवर आणण्यासाठी उद्यापासूनच काम करू. सुरुवातीच्या दिवसांत आपल्या मंत्रिमंडळाशिवाय प्रशासन चालवावे लागले, त्यानंतर भीषण पूरपरिस्थिती आणि करोना व्यवस्थापन यांच्या आव्हानाचा सामना करावा लागला हे लक्षात घेता ही दोन वर्षे आपल्यासाठी अग्निपरीक्षेची होती, असे येडियुरप्पा म्हणाले.
B. S. Yeddyurappa’s Supporter commits suicide over resignation
महत्त्वाच्या बातम्या
- महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोदी सरकारची ७०० कोटींची मदत जाहीर
- Good News : पुढच्या महिन्यापासून लहान मुलांसाठी देखील कोरोना लस उपलब्ध आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांची माहिती
- Maharashtra Flood : पूरग्रस्त भागांमध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारींचा दौरा टीका मात्र आशिष शेलारांवर! काय म्हणाले शरद पवार ?
- कोविड काळात निराधार झालेल्या बालकांचा खोटा आकडा सादर केल्याबद्दल ममता सरकारला सुप्रीम कोर्टाची फटकार