- औरंगाबाद म्हणजे आशियातील वेगाने विकसित होणारे शहर .
- स्मार्ट सिटीमुळे औरंगाबाद चांगलेच विकसित झाले आहे.
- समृद्धी महामार्ग , धुळे सोलापूर महामार्ग यानंतर आता औरंगाबादमध्ये आगामी काळात बाबा पेट्रोलपंप ते वाळूजपर्यंत तीन मजली उड्डाण पूल होईल,
विशेष प्रतिनिधी
लातूरः औरंगाबादमध्ये नागपूरच्या धर्तीवर 20 किलोमीटर लांबीचा तीन मजली उड्डाणपूल उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. भारतातील रस्ते व पूल बांधणीत अत्याधुनिक जागतिक तंत्रज्ञान वापरण्यात येत असून कमी खर्चात, कमी वेळेत दर्जेदार काम केले जाईल, अशी ग्वाहीदेखील नितीन गडकरी यांनी दिली.aurangabad Three-storied flyover in Aurangabad on the lines of Nagpur
लातूर जिल्ह्यातील 19 महामार्ग प्रकल्पाचे लोकार्पण आणि भूमीपूजन गुरुवारी गडकरी यांच्या हस्ते झाले. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या उड्डाणपूलामुळे थेट पुणे, नगरकडे जाणाऱ्या वाहनांची मोठी सोय होणार आहे.
आपल्या भाषणातही त्यांनी या पुलाचे महत्त्व स्पष्ट केले. नव्या प्रकल्पामुळे औरंगाबादच्या चौकातून थेट वाळूजपर्यंत वाहनधारकांना जाणे सोयीचे होईल. परिणामी पुण्याला जाणे अधिक सोपे होईल.
कसा असेल त्रिस्तरीय उड्डाणपूल?
यावेळी नियोजित तीन मजली उड्डाणपुलाविषयी बोलताना बनसोडे म्हणाले, या प्रकल्पात पहिल्या मजल्यावर आठ पदरी लेन असेल तर दुसऱ्या मजल्यावर आणखी एक पूल असेल.
तर तिसऱ्या मजल्यावर मेट्रो, इलेक्ट्रिकवर चालणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कार्यरत करण्याची योजना आहे. मराठवाड्याला 20 हजार कोटींचे रस्ते मंजूर केले आहेत. रस्ते हे केवळ गावे जोडत नाहीत तर माणसांची मनेही जोडतात, असे वक्तव्य त्यांनी यावेळी बोलताना केले.
aurangabad Three-storied flyover in Aurangabad on the lines of Nagpur
महत्त्वाच्या बातम्या
- पृथ्वीवर लघुग्रह, धूमकेतू धडकू नयेत यासाठी ‘नासा’ची महत्वाकांक्षी मोहीम सुरु
- तरुण तेजपालचा इनकॅमेरासाठीचा अर्ज खंडपीठाने फेटाळला
- कर्नाटकातील मुर्डेश्वरर दहशतवाद्यांच्या रडारवर, इसिसच्या मुखपत्रात दाखविली भग्नमूर्ती
- महाराष्ट्र : करोनाने मृत्यू झालेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांना राज्य शासन ५० हजार रुपयांची मदत करणार ; विजय वडेट्टीवार यांनी दिली माहिती