विरोधकांवर हल्ले करून त्यांचे तोंड गप्प करण्याचे पश्चिम बंगालचे लोण राजस्थानातही पोहोचले आहे. राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजीता कोली यांच्या मोटारीवर गुंंडांनी हल्ला केला.Attack on BJP MP who accused of hiding corona figures by state government
विशेष प्रतिनिधी
जयपूर : विरोधकांवर हल्ले करून त्यांचे तोंड गप्प करण्याचे पश्चिम बंगालचे लोण राजस्थानातही पोहोचले आहे. राज्य सरकारने कोरोना आकडेवारी लपविल्याचा आरोप करणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या खासदार रंजीता कोली यांच्या मोटारीवर गुंंडांनी हल्ला केला.
रंजीता कोली या एका सामूहिक आरोग्य केंद्राची पाहणी करण्यासाठी करण्यासाठी गेलेल्या होत्या. धरसोनी गावात अज्ञात गुंडांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. यामध्ये खासदाराच्या गाडीच्या काचा फुटल्या आहेत.
रंजीता कोली यांना दुखापत झाली आहे. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही दिवसापूर्वी रंजीता कोली यांनी कोरोना आकडेवारी लपवल्याचा आरोप राज्य सरकारवर केला होता.
त्यामुळे कॉँग्रेसच्या गुंडांकडून हा हल्ला झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, हा हल्ला खूप भयंकर होता. हल्यानंतर खासदार बेशुद्ध पडल्या. घटनेनंतर तातडीने कळविल्यावरही पोलीस लवकर घटनास्थळी पोहोचले नाहीत.
खासदारांच्या सोबत असलेल्यांनी भरतपूर येथील जिल्हाधिकाºयांनाही वारंवार फोन केले. मात्र, त्यांनी फोन उचलला नाही. खासदार रंजीता कोली यांनी तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री अशोक गहलोत यांना पत्र लिहिले होते. भरतपूर मतदारसंघात कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी कमी होत आहे.
चाचण्या कमी झाल्यामुळे कोरोना रुग्णसंख्या किती आहे हे समजत नाही. दिवसाला किमान ५ हजार आरटीपीसीआर चाचणी करण्याची मागणी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. त्यासोबत भरतपूर जिल्ह्यातील कोरोना आकडेवारी लपवू नका असेही म्हटले होते.
Attack on BJP MP who accused of hiding corona figures by state government
महत्त्वाच्या बातम्या
- Monsoon Updates : नैर्ऋत्य मान्सून बंगालच्या उपसागराकडे वळला, 31 मेपर्यंत केरळला पोहोचण्याची शक्यता
- राज्यात लॉकडाऊन आणखी १५ दिवस वाढविण्याचा विचार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
- अनाथांना आधार, देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारले ११० अनाथ मुलांचे पालकत्व
- CBSE 12th Board Exam 2021 : बारावीची परीक्षा रद्द होणार की नाही, सोमवारी येणार सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय
- Corona Cases In India : देशात 44 दिवसांनंतर सर्वात कमी रुग्ण आढळले, 24 तासांत 1.86 लाख रुग्णांची नोंद