वृत्तसंस्था
नवी दिल्ली : या मुलाचे वय अवघे 14 वर्षे आहे. मात्र त्याने एवढ्या कमी वयातही मोठे यश मिळवले आहे. त्याचे टॅलेंट पाहून सगळेच आश्चर्यचकित होतात. हा मुलगा किती हुशार आहे, याचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की, तो पुढील आठवड्यात त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करणार आहे. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलन मस्क यांची कंपनी स्पेस एक्सने त्याला नोकरीही दिली आहे. कॅरॉन काझी असे या मुलाचे नाव आहे. तो अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील रहिवासी आहे.At the age of just 14, the boy got his dream job, hired by Elon Musk due to his tremendous talent
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, कॅरॉन पुढील आठवड्यात सांता क्लारा विद्यापीठातून पदवी पूर्ण करेल. विद्यापीठातून पदवी मिळवणारा तो सर्वात लहान मुलगा आहे. पुढील महिन्यात तो SpaceX मध्ये नोकरी सुरू करेल. कॅरॉन संगणक विज्ञान आणि अभियांत्रिकी पदवी प्राप्त करेल. त्यामुळे स्पेसक्राफ्ट बनवणाऱ्या स्पेसएक्सने त्याला नोकरी दिली आहे. तो नेहमीच इतर मुलांपेक्षा वेगळा असल्याचे त्याचे कुटुंबीय सांगतात.
वयाच्या 11व्या वर्षी घेतला विद्यापीठात प्रवेश
कॅरॉन म्हणतो, “माझ्या शिक्षकांना, पालकांना आणि बालतज्ज्ञांना तिसर्या इयत्तेदरम्यानच समजले की माझ्या लवकर शिकण्याच्या क्षमतेसाठी मुख्य प्रवाहातील शिक्षण हा योग्य मार्ग नाही.” त्याचा बुद्ध्यांक खूप जास्त असल्याचे कुटुंबीयांना समजले. त्याच्याकडे भावनिक बुद्धिमत्ता देखील आहे. त्यामुळे तो इतर मुलांपेक्षा जास्त परिपक्व आहे. वयाच्या 9 व्या वर्षी तो लास पॉझिटास कम्युनिटी कॉलेजमध्ये गेला. त्यानंतर वयाच्या 11 व्या वर्षी विद्यापीठात शिकू लागला.
कॅरॉन आईसोबत राहतो
कॅरॉन सांगतो की, त्याला कॉलेजमध्ये शिकायला खूप मजा आली. त्याने इंटेल लॅबमध्ये इंटर्न म्हणूनही काम केले आहे. जिथे लोक म्हणतात की कॅरॉनने त्याचे बालपण गमावले आहे. पण तो म्हणतो की, तसं काहीच नाही. उलट तो अशा मोठ्या संधींचे कौतुक करतो. तो म्हणतो, ‘मी एक सॉफ्टवेअर अभियंता म्हणून SpaceX जॉईन करत आहे.’ कॅरॉन आपल्या आईसोबत एका अपार्टमेंटमध्ये राहतो. आता जुलैमध्ये, तो SpaceX च्या Starlink टीममध्ये नोकरी सुरू करण्यासाठी वॉशिंग्टनला जाण्याची तयारी करत आहे.
जगातील सर्वात लहान स्पेस इंजिनिअर
सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये कॅरॉनने म्हटले, “मी सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून पृथ्वीवरील सर्वोत्तम कंपनीच्या टीममध्ये सामील होत आहे. ही अशा कंपनींपैकी एक आहे जी वय नाही तर प्रतिभा पाहते. असा दावा केला जातो की आजपर्यंत कोणीही इतक्या कमी वयात हे करू शकले नाही.
SpaceX कडून नोकरीची ऑफर मिळाल्यानंतर तो जगातील सर्वात लहान वयाचा अंतराळ अभियंता बनला आहे. तो आता जगातील सर्वात प्रतिभावान आणि नामांकित संगणक अभियंत्यांसोबत काम करेल आणि अंतराळ यानाची रचना करण्यात मदत करेल.
At the age of just 14, the boy got his dream job, hired by Elon Musk due to his tremendous talent
महत्वाच्या बातम्या
- Religious Conversion : ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचा सापळा रचणाऱ्या शाहनवाजला मुंबईतून अटक
- पंतप्रधान पदाच्या शर्यतीत नितीश कुमार बाहेर, तर मग उरलेत किती??
- न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका! वारकऱ्यांची सुरक्षा महत्वाची – देवेंद्र फडणवीस
- आळंदीत लाठीमार झालेला नाही, देवेंद्र फडणवीसांचा स्पष्ट खुलासा