विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास शत्रूचा सर्वनाश करणार, आमच्या वेळेनुसार, आमच्या स्टाईलने उत्तर देणार. पाकिस्तानला आत मध्ये घुसून मारणार बचावाची एकही संधी नाही देणार, अशी गर्जना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केली.
पाकिस्तानी नष्ट केल्याचा धावा केलेल्या पंजाब मधल्या होशियारपूर जिल्ह्यातल्या आदमपूर हवाई तळाला पंतप्रधान मोदींनी आज सरप्राईज व्हिजिट केली. तिथे जवानांची संवाद साधला. भारतीय सैन्य दलाविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले :
ऑपरेशन सिंदूरमुळे भारतीय लष्कराची ताकद ही जगाला समजली आहे. यापुढे भारत कधीही अणवस्त्राच्या धमकीला घाबरणार नाही. भारतीय ड्रोन आणि मिसाईलच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या लष्कराला झोपही लागणार नाही.
भारत हा गौतम बुद्धांचा देश आहे, तसेच गुरू गोविंद सिंहांचा देखील देश आहे. अधर्माचा संहार करण्यासाठी भारत हातात शस्त्र घेईल. यापुढे जर भारताकडे वाकड्या नजरेने पाहाल तर सर्वनाश करू, त्यासाठी वेळ आणि पद्धत हे आम्ही ठरवू.
भारत माता की जय हा आवाज देशातील त्या प्रत्येकाचा आहे जो देशासाठी काहीतरी करु इच्छितो. ज्यावेळी आमचे ड्रोन्स आणि मिसाईल शत्रूचा लक्ष्यभेद करतात, त्यावेळी शत्रूला फक्त भारत माता की जय ही घोषणा ऐकू येते. अंधारात ज्यावेळी स्फोट उडतात आणि शत्रूचा परिसर प्रकाशमय होतो त्यावेळी त्यांना भारत माता की जय हा आवाज ऐकू येतो.
जगाने भारतीय वायूदलाची ताकद पाहिली. आमच्या सैन्यात शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून घेण्याची धमक आहे. यापुढे ज्यावेळी भारतीय पराक्रमाची चर्चा होईल त्यावेळी भारतीय सैन्याच्या कामगिरीची नोंद घेतली जाईल. भारतीय सैन्य हे देशातील युवकांसाठी प्रेरणा बनले आहे.
भारतीय लष्करामुळेच ऑपरेशन सिंदूर यशस्वी ठरलं. प्रत्येक भारतीय नागरिक आपल्या कार्याला सलाम करतोय. ऑपरेशन सिंदूर हे काही सामान्य सैन्य अभियान नव्हतं. ते भारताचे नीती, आणि निर्णायक क्षमतेची त्रिवेणी आहे.
अधर्माचा विनाश करण्यासाठी हाती शस्त्र
भारत बुद्धांची धरती आहे, तसेच गुरू गोविंदसिंहांची देखील धरती आहे. अधर्माचा विनाश करण्यासाठी भारत आता हाती शस्त्र घेईल.
ऑपरेशन सिंदूरमध्ये, मनुष्यबळ आणि यंत्रांमधील समन्वय देखील आश्चर्यकारक होता. भारताकडे पारंपरिक संरक्षण व्यवस्था आहे ज्याने अनेक युद्धे पाहिली आहेत. एस-400 ने आपल्या एअर डिफेन्स सिस्टिमला अभूतपूर्व बळ दिले आहे. एक मजबूत सुरक्षा कवच ही भारताची ओळख बनली आहे. पाकिस्तानने अनेक प्रयत्न करूनही कुठेही काहीही नुकसान झाले नाही.
आता ऑपरेशन सिंदूर हे भारतासाठी “न्यू नॉर्मल” आहे. यापुढे भारतावर जर पुन्हा हल्ला झाला तर आम्ही तीन पद्धतीचा वापर करू
1 : जर दहशतवादी हल्ला झाला तर आम्ही आमच्या पद्धतीने, आमच्या अटींवर आणि आमच्या वेळेनुसार त्याला प्रत्युत्तर देऊ.
2 : भारत कोणताही आण्विक ब्लॅकमेल सहन करणार नाही.
3 : दहशतवादाला आश्रय देणाऱ्या सरकारला, दहशतवादाच्या सूत्रधारांपासून वेगळे मानणार नाही. दोघांनाही समान शिक्षा करू.
At the Adampur Air Base, PM Narendra Modi said, “Every moment of #OperationSindoor bears testimony to the capability of Indian armed forces.
महत्वाच्या बातम्या
- PM Modi च्या भाषणात no between the lines; पाकिस्तानच्या छातीवर केलाय वार, पाकिस्तान-दहशतवाद्यांना एकच न्याय आणि nuclear blackmail bye bye!!
- Trade आणि terrorism, रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाहीत; पाकिस्तान बरोबरच अमेरिकेलाही पंतप्रधान मोदींचा इशारा!!
- विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट
- Virat Kohli : विराट कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा अन् इंस्टावर भावनिक पोस्ट