• Download App
    आसाममध्ये २९ टक्यांनी वाढतेय मुस्लिमांची लोकंसख्या, रोखण्यासाठी पावले उचलण्याचा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा निर्धार|Assam Chief Minister Hemant Biswa Sarma decides to take steps to curb Muslim population growth

    आसाममध्ये २९ टक्यांनी वाढतेय मुस्लिमांची लोकंसख्या, रोखण्यासाठी पावले उचलण्याचा मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांचा निर्धार

    विशेष प्रतिनिधी

    गुवाहाटी : आसाममध्ये मुस्लिमांची लोकसंख्या 29 टक्यांनी आणि हिंदूंची लोकसंख्या ही 10 टक्के वेगाने वाढते आहे. त्यामुळे मुस्लिम समाजाच्या वाढत्या लोकसंख्येची गती कमी करण्यासाठी विशेष धोरणात्मक पावले उचलणार असल्याचा निर्धार आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांनी सांगितले.Assam Chief Minister Hemant Biswa Sarma decides to take steps to curb Muslim population growth

    राज्यातील अल्पसंख्यकांच्या वाढत्या लोकसंख्येची गती कमी करण्यासाठी आसाम सरकारतर्फे विशेष धोरणात्मक पावले उचलण्यात येणार आहेत. गरिबी आणि निरीक्षरता निर्मूलन या उद्देशाने या उपाययोजना करण्यात येणार आहेत.



    राज्य सरकारचे प्राथमिक लक्ष्य आरोग्य आणि शैक्षणिक क्षेत्राला चालना देण्याचा आहे. याद्वारे उचलण्यात येणाºया पावलाद्वारे मुस्लिमांची वाढती लोकसंख्या रोखली जाईल, असे मुख्यमंत्री सरमा यांनी सांगितले.
    सरमा म्हणाले, खरेतर अशा प्रकारची भावना ही समाजातूनच आली पाहिजे. कारण सरकारने याबाबत काही प्रक्रिया सुरू केल्यास त्याचा राजकीय अर्थ काढला जाईल.

    हा राजकीय मुद्दा नाही. तर सर्व माता आणि भगिनींच्या कल्याणासाठी आणि त्याहूनही अधिक म्हणजे हे समाजाच्या भल्यासाठी आहे. आकडेवारी पाहता मुस्लिमांची लोकसंख्या 29 टक्क्यांनी आणि हिंदूंची लोकसंख्या ही 10 टक्के वेगाने वाढते आहे. आपण मुस्लिम समाजाच्या नेत्यांशी सतत संपर्कात आहोत.

    मुस्लिम समाजात नेतृत्व उभारण्यासाठी पुढच्या महिन्यात अनेक संघटनांशी चर्चा करणार आहोत.आपले सरकार दोन मुलांसह लोकसंख्या धोरण राबवण्यासाठी योजना तयार करत आहे. याचे पालन करणाऱ्या कुटुंबांना खास योजनेद्वारे लाभ मिळेल. अशा प्रकारचा एक नियम पंचायत निवडणूक आणि राज्य सरकारच्या नोकºयांसाठी आधीपासूनच आहे, असे सरमा यांनी अलीकडेच सांगितले होते.

    Assam Chief Minister Hemant Biswa Sarma decides to take steps to curb Muslim population growth

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Stock Market : 2025 मध्ये शेअर बाजारातून परदेशी-गुंतवणूकदारांची सर्वात मोठी एक्झिट, विक्रमी ₹1.58 लाख कोटी काढले; 2026 मध्ये FII च्या परतण्याची अपेक्षा

    Zardari Warns : झरदारी म्हणाले- पाकिस्तान पुन्हा युद्धासाठी तयार, मे महिन्यात भारताला समजले की युद्ध मुलांचा खेळ नाही

    Suvendu Adhikari : सुवेंदु अधिकारी म्हणाले- बांगलादेशला गाझासारखा धडा शिकवला पाहिजे