वृत्तसंस्था
कोची (केरळ) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हेच गांधी परिवाराचे काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवार असणार आहेत. ते स्वतःच तारीख ठरवून अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा अर्ज दाखल करणार आहेत. Ashok Gehlot is the candidate of the Gandhi family
राहुल गांधी सध्या भारत जोडो यात्रेत केरळ मधील कोचीमध्ये आहेत. कोचीमध्ये जाऊन अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारण्याची गळ देखील घातली आहे. परंतु गांधी परिवारानेच हा निर्णय घेतला आहे की काँग्रेसच्या या पुढचा अध्यक्ष गांधी परिवारातील नसेल. त्यामुळे आपण ही स्वतः ही निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून लवकरच तारीख निश्चित करून उमेदवारी अर्ज दाखल करू, अशी माहिती अशोक गेहलोत यांनी पत्रकारांना दिली आहे.
देशभरातील सर्व प्रदेशातील काँग्रेस कमिट्या एकापाठोपाठ एक ठराव करून राहुल गांधी यांना अध्यक्षपदी विराजमान होण्याचा आग्रह करत आहेत. या सर्वांची विनंती आपण स्वीकारावी, असे मी त्यांना वारंवार सांगितले परंतु ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिल्याने मी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उतरण्याचा निर्णय घेतला आहे, असे अशोक गेहलोत म्हणालेत.
देशात मजबूत विरोधी पक्ष असण्याची जरूरत आहे आणि ती जबाबदारी कोणीतरी पार पाडली पाहिजे. यासाठी आता मी पुढाकार घेणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
अशोक गेहलोत यांच्या या स्पष्ट निवेदनानंतर ते स्वतःच काँग्रेस अध्यक्षपदाचे गांधी परिवाराचे उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे. आता त्यांच्यासमोर नेमके कोण आव्हान उभे करणार? शशी जरूर हे काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार का? की जी 23 गटाचा अन्य कोणी डार्क हॉर्स मैदानात येणार?, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Ashok Gehlot is the candidate of the Gandhi family