• Download App
    कोविड केसेसमध्ये ६८ टक्क्यांची घट; १७ कोटी २० लाख लोकांना लसीचा पहिला डोस दिला; आरोग्य मंत्रालयाची माहिती As per Our World in Data, the number of people who have received at least one dose of vaccine in India

    कोविड केसेसमध्ये ६८ टक्क्यांची घट; १७ कोटी २० लाख लोकांना लसीचा पहिला डोस दिला; आरोग्य मंत्रालयाची माहिती

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली – देशभरातील कोविड केसेसमध्ये ६८ टक्क्यांची घट आली आहे. १७ कोटी २० लाख नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस दिला गेला आहे. ६६ टक्के केसेस या ५ राज्यांमधून येताहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत दिली. As per Our World in Data, the number of people who have received at least one dose of vaccine in India

    याचा अर्थ कोरोनाची दुसरी लाट ओसरण्याची ही चिन्हे आहेत. उरलेल्या ४४ टक्के केसेस ३१ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधून येत आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट स्थानिक पातळीवर उपाययोजना करून रोखण्याची स्थिती निर्माण झाली आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव आगरवाल यांनी सांगितले. देशाचा एकूणातला रिकव्हरी रेट ९३.१ टक्के असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

    देशभरात ६० टक्के ज्येष्ठ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. जगभरातील डेटाशी भारताची तुलना केली तर १७ कोटी २० लाख नागरिकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. ही संख्या अमेरिकेतील सध्याच्या लसीकरणाच्या आकड्यापेक्षा मोठी आहे, अशी माहिती नीती आयोगाचे आरोग्य विषयक सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी दिली.

    कोव्हॅक्सिन आणि झायडस या लसींच्या लहान मुलांवर चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचा वापर केव्हा करायचा हे ठरवावे लागेल. माहिती आणि विश्लेषणाचे काम सातत्याने सुरू आहे. आपल्याला मुलांच्या लसीकरणासाठी २५ कोटी डोसची गरज आहे. भारत बायोटेक आणि जागतिक आरोग्य संघटना यांची माहिती एकमेकांना शेअर करण्याचे काम चालू आहे. यातून लसनिर्मितीला वेग येईल, असे डॉ. पॉल यांनी स्पष्ट केले.

    As per Our World in Data, the number of people who have received at least one dose of vaccine in India

    Related posts

    इंदिरा गांधींची आठवण काढून काँग्रेसने मोदींना टोचले; पण शशी थरूर + चिदंबरम यांनी मोदींच्या निर्णयाला वाखाणले!!

    दहशतवाद्यांसाठी पाकिस्तान आता उरला नाही “सुरक्षित स्वर्ग”, हेच Operation sindoor चे सर्वांत मोठे यश!!

    Modi – J. D. Vance चर्चेत nuclear या शब्दाचा उल्लेखही नाही, पाकिस्तानने आगाऊपणा केला, तर भारताचा प्रतिकार जास्त विध्वंसक!!