• Download App
    उत्तर रेल्वेच्या तब्बल २०७ गाड्या तीन दिवस रद्द, ३६ रेल्वेंच्या मार्गात होणार बदल; G-20 समिटमुळे निर्णय As many as 207 trains of Northern Railway canceled for three days Decision due to G20 Summit

    उत्तर रेल्वेच्या तब्बल २०७ गाड्या तीन दिवस रद्द, ३६ रेल्वेंच्या मार्गात होणार बदल; G-20 समिटमुळे निर्णय

    7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात काही वाहतूक नियम लागू होऊ शकतात.

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीत होणाऱ्या G20 शिखर परिषदेची तयारी जवळपास अंतिम टप्प्यात आली आहे. दिल्ली सरकारने यापूर्वीच कडक सुरक्षा व्यवस्थेसह तीन दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती. आता सुरक्षेच्या दृष्टीने उत्तर रेल्वेने 207 गाड्या तीन दिवसांसाठी रद्द केल्या आहेत. उत्तर रेल्वेने शनिवारी जारी केलेल्या निवेदनानुसार, हा आदेश 9, 10 आणि 11 सप्टेंबर असे तीन दिवस लागू राहील. As many as 207 trains of Northern Railway canceled for three days Decision due to G20 Summit

    उत्तर रेल्वेने सांगितले की, “नवी दिल्लीतील G20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर, 9, 10 आणि 11 सप्टेंबर रोजी एकूण 207 ट्रेन सेवा रद्द केल्या जातील. 36 ट्रेन सेवा शॉर्ट टर्मिनेटेड/शॉर्ट ओरिजिनेटेड असतील.”

    G-20 शिखर परिषद 9 आणि 10 सप्टेंबर रोजी प्रगती मैदानाच्या भारत मंडपममध्ये होणार आहे. सर्व देशांचे प्रतिनिधी राजघाट, नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट (NGMA) आणि भारतीय कृषी संशोधन संस्था (IARI) पूसा येथेही भेट देतील. 7 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि आसपासच्या भागात काही वाहतूक नियम लागू होऊ शकतात. फक्त NDMC आणि NH-48 वर रहदारी निर्बंध असतील.

    As many as 207 trains of Northern Railway canceled for three days Decision due to G20 Summit

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Elon Musk’s xAI Grok : मस्क यांच्या नव्या AI फीचरवरून वाद; शिव्यांचा वापर, युझर्सशी फ्लर्ट व कपडे काढताहेत AI-बॉटस

    Nimisha Priya निमिषा प्रियावर फाशीची टांगती तलवार कायम, येमेनमधील न्यायप्रक्रियेवर गंभीर प्रश्न

    Robert Vadra : मनी लाँड्रिंग प्रकरणात वाड्रा यांची 5 तास चौकशी; संजय भंडारीशी आर्थिक संबंधांवरून EDने घेतली झाडाझडती