• Download App
    ED चौकशीत केजरीवालांनी घेतली आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे; ED च्या वकिलांची कोर्टात माहिती, केजरीवालांना न्यायालयीन कोठडी!! Arvind Kejriwal named Atishi and Saurabh Bharadwaj during interrogation

    ED चौकशीत केजरीवालांनी घेतली आतिशी आणि सौरभ भारद्वाज यांची नावे; ED च्या वकिलांची कोर्टात माहिती, केजरीवालांना न्यायालयीन कोठडी!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : दिल्लीच्या दारू घोटाळ्यासंदर्भात अटक केलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ED चौकशी आणि तपासादरम्यान आपल्याच मंत्रिमंडळातले दोन मंत्री आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज यांची नावे घेतली. दारू घोटाळ्यात अटक केलेला इव्हेंट कंपनीचा मालक विजय नायर हा आपल्याला नव्हे, तर आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज या दोघांनाच रिपोर्टिंग करत होता. त्यामुळे त्याच्या संदर्भातली सगळी माहिती त्या दोघांकडेच आहे,असे केजरीवाल यांनीED अधिकाऱ्यांना चौकशी आणि तपासात सांगितले. ही माहिती ED च्या वकिलांनी राऊज अव्हेन्यू कोर्टात दिली.  Arvind Kejriwal named Atishi and Saurabh Bharadwaj during interrogation

    आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज हे दोन्ही मंत्री सध्या बाहेर असून आतिशी या दिल्लीच्या आम आदमी पार्टी सरकारच्या मुखवटा बनवून अरविंद केजरीवालांचे संदेश दिल्लीच्या जनतेला वाचून दाखवत असतात. काल रामलीला मैदानावर झालेल्या “इंडिया” आघाडीच्या रॅलीमध्ये देखील आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे दोन मंत्री आघाडीतल्या इतर नेत्यांचे स्वागत करण्यात पुढे होते. पण आता खुद्द केजरीवालांनी ED चा चौकशी आणि तपासात आतिशी मार्लेना आणि सौरभ भारद्वाज या दोन मंत्र्यांची नावे घेतल्याने इतकेच नाहीतर ED च्या वकिलांनी भर कोर्टात त्यांची नावे सांगितल्याने हे दोन्हीही नेते आता खऱ्या अर्थाने कायद्याच्या कचाट्यात आणि राजकीय दृष्ट्या अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या सुनावणीत ED च्या वकिलांनी त्यांची नावे घेतली, ते दोन्ही मंत्री म्हणजे आतिशी आणि सौरभ भारद्वाज हे दोघेही कोर्ट रूम मध्ये हजर होते.



    आतिशी या आम आदमी पार्टीच्या गोव्याच्या निवडणुकीच्या इन्चार्ज होत्या. दारू घोटाळ्यातला सगळा पैसा गोव्याच्या विधानसभा निवडणुकीत खर्च झाल्याचे सांगण्यात येते. आम आदमी पार्टीचे राज्यसभा खासदार एन. डी. गुप्ता यांनी देखील गोवा निवडणुकी संदर्भात आतिशीचेच नाव घेतले आहे. त्यामुळे आता त्यांची पुरती राजकीय आणि कायदेशीर अडचण झाली आहे.

    दिल्लीच्या दारू घोटाळ्यात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि आम आदमी पार्टीचे खासदार संजय सिंह हे आधीच तुरुंगात आहेत त्यांच्या पाठोपाठ अरविंद केजरीवाल हे आत मध्ये गेले आहेत आणि आता केजरीवालांनी अतिशय मारलेला आणि सौरभ भारद्वाज यांचीच नावे थेट ED चौकशीत घेतल्याने हे दोन्ही मंत्री कायद्याच्या कचाट्यात अडकले आहेत त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते अशी आता स्थिती येऊन ठेपली आहे.

    एवढे असूनही अरविंद केजरीवाल हेED अधिकाऱ्यांना सहकार्य करत नाहीत ते आपल्या वेगवेगळ्या डिवाइसचे पासवर्ड आणि त्यातले तपशील सांगायला तयार नाहीत असा आरोपED च्या वकिलांनी कोर्टात केला त्यानंतर कोर्टाने अरविंद केजरीवालांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.

    Arvind Kejriwal named Atishi and Saurabh Bharadwaj during interrogation

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Nitish Kumar : नितीशकुमार एनडीएच्या नेतेपदी, आज दहाव्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार

    SC OBC Reservation : OBC आरक्षण सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टाची महाराष्ट्र सरकारला सूचना- उमेदवारी अर्ज प्रक्रिया पुढे ढकलण्याचा विचार करा!

    Mahua Moitra : बांगलादेशच्या माजी निवडणूक आयुक्तांच्या अटकेचा जुना फोटो शेअर; महुआ मोईत्रा यांची पोकळ धमकी