विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल चिडीचूप बसणार आहेत. ऐवढेच नव्हे तर दहा दिवसांसाठी गायबही होणार आहे. याचे कारण म्हणजे ते विपश्यना शिबिराला गेले आहेत.केजरीवाल रविवारपासून 10 दिवसांच्या विपश्यना शिबिराला गेले आहेत.Arvind Kejriwal disappears for ten days
पुढचे 10 दिवस ते कुणाच्याही संपर्कात नसतील. ते टीव्ही आणि वर्तमानपत्रे यांच्यापासूनही दूर राहतील, असं सांगण्यात आलं आहे. यापूवीर्देखील अनेकदा केजरीवाल हे विपश्यनेसाठी गेले आहेत.केजरीवाल हे राजकारण येण्यापूवीर्पासूनच विपश्यना करत आहेत.
वषार्तून किमान 2 वेळा ते विपश्यनेला जात असतात. यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीनंतर आणि 2013 च्या दिल्ली विधानसभा निवडणूक प्रचारानंतरदेखील ते विपश्यनेला गेले होते. महाराष्ट्रातील इगतपुरी, हिमाचल प्रदेशातील धर्मकोट यासह देशातील अनेक विपश्यना केंद्रांवर जाऊन त्यांनी विपश्यना केली आहे.
विपश्यनेच्या या 10 दिवसांच्या कालावधीत केजरीवाल यांचा बाहेरच्या जगाशी काहीही संपर्क असणार नाही. दिल्लीतील आणि देशातील कुठल्याही घडामोडी त्यांना समजू शकणार नाहीत. त्यांच्याकडे ना टीव्ही असेल, ना मोबाईल.
Arvind Kejriwal disappears for ten days
महत्त्वाच्या बातम्या
- तिसरी लाट थोपविण्यासाठी दीड लाख आयसीयू बेड तयार ठेवा , निती आयोगाची सूचना
- ED ची पहिलीच नोटीस येताच अनिल परब पत्रकारांसमोर; म्हणाले नोटीस अपेक्षितच, कायदेशीर उत्तर देईन!!; अनिल देशमुखांना ED च्या ५ नोटिसा, पण…
- पूर्वेकडे काँग्रेसमध्ये फूट पाडून ममतांचे विरोधी ऐक्य; माजी प्रदेशाध्यक्षांच्या पत्नी शिखा मित्रा आणि आसामचे ५०० कार्यकर्ते तृणमूळ काँग्रेसमध्ये
- अमेरिकेचे अफगाणिस्तानातील जलालाबादेतील दहशतवाद्यांवर हवाई हल्ले; रॉकेट हल्ल्याला उत्तर