वृत्तसंस्था
ग्वाल्हेर : मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर कोर्टाने आरजेडी सुप्रीमो आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ग्वाल्हेरच्या खासदार-आमदार न्यायालयाकडून वॉरंट जारी करण्यात आले आहे. शस्त्रास्त्र कायद्यासंदर्भात हे वॉरंट जारी करण्यात आले आहे. 1995 आणि 97 च्या फॉर्म 16 अंतर्गत शस्त्रास्त्रांचा पुरवठा केल्याचा आरोप आहे. पोलिसांच्या तपासानंतर लालू प्रसाद यादव यांचे नाव समोर आले.Arrest warrant issued against former Chief Minister Lalu Prasad Yadav, Gwalior MP-MP Court ordered
याआधी 30 जानेवारीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) लालू प्रसाद यांची सुमारे 10 तास चौकशी केली होती. रेल्वेतील कथित लँड फॉर जॉब घोटाळ्यात मनी लाँड्रिंगच्या चौकशीसंदर्भात एजन्सीने लालूंची चौकशी केली होती. लालू पहिल्यांदाच तपास यंत्रणेसमोर हजर झाले होते.
लालू प्रसाद सकाळी 11 वाजता मुलगी मिसा भारतींसोबत पाटणा येथील ईडी कार्यालयात पोहोचले. मात्र, मिसा यांना आत जाऊ दिले नाही. यादरम्यान ईडीने लालूंना 70 प्रश्न विचारले. रात्री नऊच्या सुमारास लालू यादव ईडी कार्यालयातून बाहेर आले. मात्र, लालूंनी स्वत:ला निर्दोष असल्याचे सांगून या संपूर्ण प्रकरणापासून अंतर राखले.
या प्रकरणाच्या तपास अधिकाऱ्यांनी प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत लालूंचे जबाब नोंदवले होते. तपास यंत्रणेने लालूंची 10 तास चौकशी केली आणि कथित भ्रष्टाचार आणि मनी लाँड्रिंगशी संबंधित 70 प्रश्न विचारले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लालूंना प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी दीड ते दोन मिनिटे लागली.
Arrest warrant issued against former Chief Minister Lalu Prasad Yadav, Gwalior MP-MP Court ordered
महत्वाच्या बातम्या
- आम्ही घोषणापत्र आणत नाही, आम्ही संकल्पपत्र आणतो’ पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर ओढले ताशेरे
- अखिलेश यादवांची समाजवादी पार्टी अडखळली; उत्तर प्रदेशात एक दोन नव्हे, तब्बल 9 उमेदवार बदलण्याची वेळ!!
- कर्नाटकच्या अपक्ष खासदार सुमलता अंबरीश यांचा भाजपमध्ये प्रवेश
- मुख्तार अन्सारीवर विषप्रयोगाचे आरोप बिनबुडाचे, चौकशी सुरू अहवाल येईल- राजनाथ सिंह