वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विद्यार्थ्यांनी लोकप्रिय केलेल्या परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमासाठी तब्बल १४ लाख विद्यार्थी आणि शिक्षकांनी नोंदणी केली आहे. यात १० लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा आणि ३ लाख शिक्षकांचा समावेश आहे.Around 14 lakhs students, teachers & parents have registered for 4th edition of Pariksha Pe Charcha to be held tomorrow
१ लाख अन्य व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. उद्या सायंकाळी ७.०० वाजता हा ऑनलाइन संवादाचा कार्यक्रम होईल. संवाद कार्यक्रमाची ही चौथी एडिशन आहे.
या कार्यक्रमाच्या नोंदणीसाठी खुद्द पंतप्रधान मोदींनी पुढाकार घेऊन आपल्या ट्विटर हँडलवरून विद्यार्थ्यांना आवाहन करणारा एक विडिओ जारी केला होता. त्याला विद्यार्थी आणि शिक्षकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी एएनआय वृत्तसंस्थेला सांगितले.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने घेतलेल्या क्रिएटिव्ह रायटिंग स्पर्धेत ८१ देशांमधल्या विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. या क्रिएटिव्ह रायटिंगमधून आलेल्या मुद्द्यांचाही पंतप्रधान मोदी आपल्या परीक्षा पे चर्चा या संवादात समावेश करणार आहेत.
पंतप्रधानांना प्रश्न विचारण्यासाठी विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात येऊन त्यांची निवड करण्यात आली आहे. विजेत्यांना पंतप्रधानांच्या स्वाक्षरी केलेला फोटो भेट म्हणून देण्यात येणार आहे.