वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ॲपल कंपनीने म्हणे काही विशिष्ट व्यक्तींना एक संदेश पाठवलाय तुमचा आयफोन सरकार हॅक करतेय!!, हा तो संदेश आहे. पण या संदेशाचे वैशिष्ट्य असे की तो संदेश “फक्त” तृणमूळ काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा, काँग्रेसचे खासदार शशी थरूर, ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेडा यांनाच आला आहे.Apple sent a message saying, Government is hacking your iPhone!!; Message “only” to Mahua Moitra, Shashi Tharoor Priyanka Chaturvedi and Pawan Khed!!
ॲपल कंपनीने म्हणे, या चार नेत्यांच्या फोनवर संदेश पाठवला आहे, की स्टेट स्पॉन्सर अटॅकर्स तुमच्या आयफोनशी छेडछाड करत आहेत. तुमची पर्सनल माहिती डेटा अथवा काही सेन्सिटिव्ह कंटेंट उचलण्याचा प्रयत्न होत आहे तुम्ही सावध राहावे!!
या संदेशाचे स्क्रीनशॉट काढून वर उल्लेख केलेल्या सर्व नेत्यांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर ते शेअर केले आहेत आणि त्यावरूनच केंद्रातल्या मोदी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आमचे फोन हॅक करण्याशिवाय सरकारला दुसरे उद्योग नाहीत का??, असा सवाल शशी थरूर यांनी केला आहे. मोदी सरकार तुम्ही हे का करता असा सवाल पवन खेडा यांनी केला आहे, तर “शेम ऑन यु” या शब्दात प्रियांका चतुर्वेदी यांनी या कथित हॅकिंगचा विरोध केला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा सध्या पैसे घेऊन संसदेत प्रश्न विचारण्याच्या मुद्द्यावर कायदेशीर दृष्ट्या अडचणीत आल्या आहेत. अदानी मुद्द्यावर मोदी सरकारला प्रश्न विचारण्यासाठी महुआ मोईत्रा यांनी लाच घेतली याचे पुरावे लोकसभा अध्यक्षांना मिळाले आहेत. त्यावर त्यांची चौकशी देखील सुरू आहे. महुआ मोईत्रांना लोकसभेच्या समिती समोर चौकशी आणि तपासाला सातत्याने हजर राहावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्या आयफोनवर आलेला “विशिष्ट संदेश” याविषयी संशय तयार झाला आहे.
महुआ मोईत्रा यांनी दर्शन हिरानंदानी याला आपल्या मोबाईलचा पासवर्ड आणि आयडी शेअर केला होता. लाज घेऊन संसदेत प्रश्न या प्रकरणात दर्शन हिरानंदानी याने कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करत महुआ मोईत्रांच्या सर्व घोटाळ्यांचा पर्दाफाश केला आहे. या पार्श्वभूमीवर देखील महुआ यांच्या आयफोनवर आलेला “विशिष्ट संदेश” संशयास्पद ठरतो आहे.
Apple sent a message saying, Government is hacking your iPhone!!; Message “only” to Mahua Moitra, Shashi Tharoor Priyanka Chaturvedi and Pawan Khed!!
महत्वाच्या बातम्या
- Tata : सिंगूरची केस टाटांनी जिंकली; 776 कोटींची भरपाई मिळवली; ममतांच्या हट्टाचा पश्चिम बंगाल सरकारला फटका!!
- मराठा आंदोलनातील जाळपोळ थांबेना; आमदार प्रकाश सोळंकेच्या घरापाठोपाठ संदीप क्षीरसागरांचेही घर पेटवले; बीडमध्ये राष्ट्रवादीचे कार्यालय
- बेंगळुरूच्या वीरभद्र नगरमध्ये भीषण आग लागून अनेक बस जळून खाक
- अमृता खानविलकरची ए़वढी वर्ष काम करून इंडस्ट्रीत फक्त एकच मैत्रीण